Goa Loksabha Election Result: मयेवासीयांची श्रीपाद नाईकांना ‘विक्रमी’ साथ; विरोधकांचा स्वप्नभंग !

Shripad Naik: मये मतदारसंघाने यावेळीही उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयात मोठे योगदान दिले आहे.
Goa Loksabha Election Result Mayem constituency also contributed a lot to the victory of Shripad Naik the BJP candidate from North Goa
Goa Loksabha Election Result Mayem constituency also contributed a lot to the victory of Shripad Naik the BJP candidate from North Goa

Goa Loksabha Election Result: भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मये मतदारसंघाने यावेळीही उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयात मोठे योगदान दिले आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मये मतदारसंघातून श्रीपादभाऊंना विक्रमी मताधिक्य मिळाले आहे.

यावेळी मयेतून भाजपला १०,७५८ मतांची आघाडी मिळाली आहे. हे मताधिक्य पाहता, विरोधकांचे मनसुबे पूर्णपणे धुळीला मिळाले आहेत. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मये मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपची जादू चालली आहे. काँग्रेससह मये मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणूक लढवलेले गोवा फॉरवर्ड, आप, आणि आरजीपीचे उमेदवार भाजपच्या पराभवासाठी एकत्रित आले होते. गेल्या तीन ते चार लोकसभा निवडणुकांमध्ये मयेतील कार्यकर्त्यांनी भाजपच्याच पाठिशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे मतदानांतून दिसून आले.

Goa Loksabha Election Result Mayem constituency also contributed a lot to the victory of Shripad Naik the BJP candidate from North Goa
Goa Loksabha Election Result: 'दक्षिणेत धर्माच्या आधारावर मतदान, पहिल्यांदाच आम्ही 2 लाखांहून अधिक मते मिळवली'- भाजप प्रदेशाध्यक्ष

भाजपची ‘आघाडी’ वाढलीय

मागील तीन लोकसभा निवडणुकीत मयेतून भाजप उमेदवाराला मिळालेली आघाडी पाहता यावेळी ही आघाडी अपेक्षेबाहेर वाढली आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहिल्यास तिन्ही निवडणुकीत मयेत भाजप उमेदवाराला मतांची आघाडी मिळालेली आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मयेतून भाजप उमेदवाराला ३२०६ मतांची आघाडी मिळाली होती.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत मतांची आघाडी फुगून ती ९,७८७ इतकी झाली होती. तर २०१९ च्या निवडणुकीत मतांच्या आघाडीत घसरण होऊन ती ८९४१ अशी झाली होती. या लोकसभा निवडणुकीत मये मतदारसंघातून भाजपला १०,७५८ एवढी आघाडी मिळाली आहे.

प्रतिस्पर्धी काँग्रेसला ४,९४९ तर ‘आरजी’ला २७०२ मते मिळाली आहेत. स्वतंत्र मये मतदारसंघाची रचना झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या आठ विधानसभा निवडणुकींपैकी सलग चारवेळा मिळून पाचवेळा या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यावरून हा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Goa Loksabha Election Result Mayem constituency also contributed a lot to the victory of Shripad Naik the BJP candidate from North Goa
Goa Loksabha Election Result: उत्तरेत नाईकांचा विजयी षटकार; कॅप्टनकडून धेंपेंना ‘सायलेंट’ धक्‍का

प्रेमेंद्र शेट, आमदार- मये

मये मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असला, तरी यावेळी मतदारसंघात मताधिक्य वाढवणे हे ‘लक्ष्य’ होते. त्यासाठी रणनीती तयार करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनीही तळमळीने प्रचारकार्य केले होते. डबल इंजिन सरकारच्या सहकार्याने केलेल्या विकासकामांमुळे मतदारांचा भाजपवर पूर्ण विश्वास आहे. गेल्या वर्षभरात अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केल्याने मयेत भाजपची ताकद वाढली होती. मयेत मिळालेल्या या आघाडीचे श्रेय कार्यकर्त्यांएवढेच मतदारांना आहे. मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवल्याने त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

Goa Loksabha Election Result Mayem constituency also contributed a lot to the victory of Shripad Naik the BJP candidate from North Goa
Goa Loksabha Election Result : दक्षिणेतील वाढीव टक्का कोणाला? उत्सुकता शिगेला

मये मतदारसंघात विरोधकांचा स्वप्नभंग !

भाजप विरोधी पक्ष एकवटल्याने सर्वांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या होत्या. मात्र, मये मतदारसंघातील आघाडी रोखण्यात विरोधकांना यश आलेले नाही. मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्याच बाजूने कौल दिल्याने विरोधकांचा स्वप्नभंग झाला आहे. दरम्यान, उत्तर गोव्यातून भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक निवडून आल्याने मये मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये ‘जोश’ पसरला आहे. कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न,मयेत केलेल्या विकासकामांची ही पावती आहे,असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com