Goa Loksabha Result North Goa candidate Shripad Naik secured 19426 votes from the CM pramod sawant Sanquelim constituency Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election Result: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाची नाईकांना 'अतूट साथ'; मतदारांनी दिले विक्रमी मताधिक्य

North Goa Candidate Shripad Naik: लोकसभा निवडणुकी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयात साखळी मतदारसंघाने १९,४२६ मतांची भर घातली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result: लोकसभा निवडणुकी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयात साखळी मतदारसंघाने १९,४२६ मतांची भर घातली. त्यात १५,७६४ मतांची आघाडीच साखळीतील भाजपच्या कार्यकर्ते व मतदारांनी भाजपला दिली आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेले हे मताधिक्य ‘न भुतो..’ अशाच स्वरूपाचे असल्याने साखळीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

या निवडणुकीत साखळीतून भाजप कार्यकर्ते व नेते यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात बरीच मुसंडी मारली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मतदारसंघातील काम आणि कार्यकर्त्यांचे शिस्तबद्ध प्रचारकार्य यामुळे साखळीत भाजपने प्रथमच मतांच्या आघाडीचा लठ्ठ आकडा प्राप्त केला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जरी भाजपला विजयाकडे पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला असला तरी त्यानंतर झालेल्या पंचायत आणि साखळी नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला विजयासाठी जागा ठेवली नव्हती. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत साखळीत भाजप मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने झेप घेईल, असाच अंदाज सर्वांना होता. परंतु मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात केवळ ३,६६२ इतकी मते घातली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ८०० मते घेणाऱ्या ‘आरजी’चे उमेदवार मनोज परब यांना साखळी मतदारसंघातून ९५२ मते मिळाली. या मतांमध्ये विधानसभा निवडणुकीपेक्षा किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. साखळीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मतांच्या मिळालेल्या आघाडीमुळे उत्साह संचारला आहे.

साखळीत विक्रमी आघाडी: सुर्लकर

साखळी मतदारसंघातील जनतेने भाजपला सदैव सकारात्मक साथ दिली आहे. या निवडणुकीतही मतदारांंनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उमेदवार श्रीपाद नाईक यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविताना विक्रमी मतांची आघाडी भाजपला मिळवून दिली आहे. या आघाडीकडे पाहता साखळीत भाजपला कोणी सहज आव्हान देऊ शकत नाही, असेच दिसते.भाजपचे हात बळकट झाले आहेत, असे साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले.

यशाचे श्रेय कार्यकर्त्यांना: सुलक्षणा

साखळी मतदारसंघात भाजपने मिळविलेले यश आणि प्राप्त केलेली आघाडी ही अभूतपूर्व अशीच आहे. या संपूर्ण यशाचे श्रेय हे साखळी मतदारसंघातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला जाते. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी अपेक्षा बाळगून मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले, असे भाजपच्या महिला प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.

आघाडी ही ‘कामांच्या अपेक्षेची': ब्लेगन

साखळीत भाजपला मिळालेली मते व भरघोस आघाडी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा खासदार श्रीपाद नाईक यांच्या प्रेमापोटी नसून ती लोकांनी आपल्या रोजगार व इतर कामांच्या अपेक्षेने दिलेली आघाडी आहे,अशी यामागची कारणे आहेत, अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT