Goa Loksabha Election Result: उत्तरेत नाईकांचा विजयी षटकार; कॅप्टनकडून धेंपेंना ‘सायलेंट’ धक्‍का

Goa Loksabha Election Result: उत्तर गोव्यातील जागा भाजपने, तर दक्षिण गोव्यातील जागा कॉंग्रेसने राखली. ७ मे रोजी मतदान झाले होते. आज पणजी आणि मडगाव येथे मतमोजणी झाली.
Goa Loksabha Result 224 Shripad Naik won from North Goa constituency while viriato fernandes won from South Goa
Goa Loksabha Result 224 Shripad Naik won from North Goa constituency while viriato fernandes won from South Goadainik gomantak

Goa Loksabha Election Result: यंदा लोकसभेच्या रूपाने श्रीपाद नाईक यांनी सलगपणे सहाव्यांदा विजय मिळविला असून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. उत्तर गोव्यातील जागा भाजपने, तर दक्षिण गोव्यातील जागा कॉंग्रेसने राखली. ७ मे रोजी मतदान झाले होते. आज पणजी आणि मडगाव येथे मतमोजणी झाली.

उत्तर गोव्यातून नाईक यांचा विजय होणार अशीच चर्चा होती. मतदानोत्तर चाचण्यांच्या कलातही ही जागा भाजप जिंकेल असे सांगण्यात आले होते, ते खरे ठरले. नाईक यांनी २०१९ मध्ये १ लाख ५ हजारांचे मताधिक्य मिळविले होते. आपलाच विक्रम मोडत याखेपेला नाईक यांनी १,१६,२५२ चे मताधिक्य मिळवून विजय मिळविला. दक्षिण गोव्यातून २०१९ मध्ये भाजपच्या नरेंद्र सावईकर यांना साडेनऊ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. याखेपेला कॉंग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांनी मागील खेपेचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या मताधिक्यात दुप्पटीने वाढ करत १४ हजारांच्या आघाडीने विजय मिळविला.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दक्षिणेतील काही विधानसभा मतदारसंघांमधून मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. मात्र, आमचा अपेक्षाभंग झाला. तेथील पराभवासाठी कोणालाही दोष देता येणार नाही. त्याची कारणमीमांसा केली जाईल. दक्षिणेत पराभव झाला असला, तरी यंदा आमच्या मतांमध्ये वाढ झाली असून आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे.

Goa Loksabha Result 224 Shripad Naik won from North Goa constituency while viriato fernandes won from South Goa
Goa Loksabha Election Result 2024: ’दक्षिण गोव्याबाबत खंत, पण गोमंतकीयांचा कौल मान्य’- भाजप प्रदेशाध्यक्ष

श्रीपाद नाईक, उमेदवार

माझा गोव्यातील मतदारांवर पूर्ण विश्‍वास आहे. मला सुरवातीपासूनच मिळालेली आघाडी कायम राहील, असे वाटत होते आणि तसेच झाले. माझा विजय नक्की असून हा गोमंतकीयांचा प्रेमामुळे होणार आहे. याचे श्रेय सर्व मतदारांना देताे. माझ्या विजयासाठी झटलेले पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनाही या विजयाचे श्रेय जाते. जनतेच्या सेवेत कार्यरत राहू.

कॅ. विरियातो फर्नांडिस, उमेदवार

दक्षिण गोव्‍यातून जरी निवडून आलो तरी हा जनतेचा विजय आहे. भाजपच्‍या लोकविरोधी धोरणांना जनता कंटाळली होती. ज्‍या कुठ्ठाळी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची जाहीर सभा झाली, त्‍या मतदारसंघातूनही काँग्रेसला १,९०० मतांची आघाडी मिळाली. माझ्‍या मते, पंतप्रधानांच्‍या विरोधात लाेकांनी दिलेले हे मत म्‍हणावे लागेल.

फोंडा तालुक्यातील मताधिक्य घटले

सासष्‍टी तालुक्‍यात काँग्रेसला कुंकळ्‍ळीत ६,०३२, नावेलीत ५,७७० तर फातोर्डात २,४३७ मतांची आघाडी प्राप्‍त झाली. काणकोण आणि सांगे या दोन मतदारसंघांत भाजपला अनुक्रमे ७,१३२ आणि ५,३२० मतांची आघाडी प्राप्‍त झाली असली तरी जी आघाडी अपेक्षित होती, ती मात्र मिळू शकली नाही. फोंडा तालुका यावेळी भाजपच्‍या बाजूने खंबीरपणे उभा राहाणार, असे म्‍हटले जायचे. या तालुक्‍यातील तीन मतदारसंघ भाजपला किमान २५ हजारांची आघाडी मिळवून देतील, असे सांगितले जात असतानाच ही आघाडी २१ हजारांच्‍या उंबरठ्यावर येऊन थांबली. मुरगाव तालुकाही भाजपला अपेक्षित आघाडी मिळवून देऊ शकला नाही.

फेरमतमोजणीची मागणी फेटाळली

दक्षिण गोव्‍यात धक्‍कादायक निकाल लागल्‍यानंतर भाजपने फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्‍यामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पुन्‍हा केली तर जाणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली होती. त्‍यावरून काही प्रमाणात अफवाही पसरू लागल्‍या होत्‍या. मात्र, दक्षिण गोव्‍याचे निर्वाचन अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अश्‍विन चंद्रू यांनी ही मागणी फेटाळून लावल्‍यामुळे या विषयावर नंतर पडदा पडला.

Goa Loksabha Result 224 Shripad Naik won from North Goa constituency while viriato fernandes won from South Goa
Goa Loksabha Election 2024 Result Update: गोव्यातील पहिल्या फेरीचे कल हाती; दक्षिणेत भाजपला झटका तर उत्तरेत दिलासा

उत्तर गोवा लेखाजोखा

उमेदवारांची मते

श्रीपाद नाईक (भाजप) २,५७,७८६ ( ३९७४ टपाल मतदान)

रमाकांत खलप (कॉंग्रेस) १,४१,५३४ (१३४३ टपाल मतदान)

तुकाराम परब (आरजी) ४५,७४४ (२८४ टपाल मतदान )

मीलन वायंगणकर (बसप) १,६३१ (३१ टपाल मतदान)

सखाराम नाईक (परिवार पक्ष) १,४१९ (१५ टपाल मतदान)

थॉमस फर्नांडिस (अपक्ष) ७६० (१४ टपाल मतदान)

शकील शेख (अपक्ष) ८०९ (९ टपाल मतदान)

ॲड. विशाल नाईक (अपक्ष) ७५३ (९ टपाल मतदान)

नोटा ६३३४ (३७ टपाल मतदान)

बाद मते ४५२ (सर्व टपाल मते)

दक्षिण गोवा लेखाजोखा

उमेदवारांची मते

कॅ. विरियातो फर्नांडिस (कॉंग्रेस) २,१७,८३६ (१,८१४ टपाल मतदान)

पल्लवी धेंपे (भाजप) २,०४,८०६ (२,४९५ टपाल मतदान)

रुबर्ट परेरा (आरजी) १८,८८५ (१६७ टपाल मतदान)

डॉ. श्वेता गावकर (बसप) १,५८ (३६ टपाल मतदान)

हरिश्चंद्र नाईक (भ्रष्टाचार निर्मूलन) ५०१ (१४ टपाल मतदान)

आलेक्सी फर्नांडिस (अपक्ष) ५४२ (१६ टपाल मतदान)

डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष) ७२० (१३ टपाल मतदान)

दीपकुमार मापारी (अपक्ष) १,३१७ (८ टपाल मतदान)

नोटा ४,८३७ (३३ टपाल मतदान)

बाद मते ४३६ (सर्व टपाल)

Goa Loksabha Result 224 Shripad Naik won from North Goa constituency while viriato fernandes won from South Goa
Goa Loksabha Election 2024 Result: उरले दिवस फक्त पाच... कमळ की हात, गोव्यात कोण बाजी मारणार?

फेरमतमोजणीची मागणी फेटाळली

दक्षिण गोव्‍यात धक्‍कादायक निकाल लागल्‍यानंतर भाजपने फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्‍यामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पुन्‍हा केली तर जाणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली होती. त्‍यावरून काही प्रमाणात अफवाही पसरू लागल्‍या होत्‍या. मात्र, दक्षिण गोव्‍याचे निर्वाचन अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अश्‍विन चंद्रू यांनी ही मागणी फेटाळून लावल्‍यामुळे या विषयावर नंतर पडदा पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com