भाजप केवळ घोषणा देत नाही तर त्या अंमलात आणतो. याच विकासाच्या जोरावर भाजपला विजय मिळाला आहे. विकास हाच प्रमुख अजेंडा आहे. 2047 मध्ये भारत जगातली पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल त्या दृष्टीने भाजपने सुरवात केली आहे. कार्यकर्त्यांनीही त्या दृष्टीने कामाला लागावे, असे उत्तर गोव्याचे भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या डबल इंजिन मॉडेलच्या यशावर लोकांचा विश्वास असल्याचे सिद्ध झाले. सनातन धर्माविरोधात भूमिका घेणाऱ्या इंडिया आघाडीला लोकांनीच जागा दाखवली. इंडिया आघाडी आणि राहुल यांची भारत जोडो यात्रा सपशेल अपयशी ठरली.
लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. तीन राज्यात भाजपने मिळवलेल्या यशानंतर ते बोलत होते.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालापैकी तीन राज्यांत भाजप विजयी आघाडी घेत असल्याचे दिसून आल्यानंतर गोव्यातही भाजपकडून जल्लोषाला सुरवात झाली. कार्यकर्ते गोवा भाजप कार्यालयाकडे मोठ्या संख्येने जमा होत आहेत.
कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून हा आनंद साजरा केला. दरम्यान, या राज्यांमध्ये गोवा भाजपमधील नेते आणि मंत्रीदेखील प्रचारासाठी गेले होते.
गोव्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि सहकारी पतसंस्थांच्या व्यावसायिक कामांमध्ये वैविध्य आणण्यास मदत करण्याचे धोरण राज्य सरकारचे आहे.
त्यामुळेच आता सहकारी पतसंस्थांना औषधे, घरगुती एलपीजी आणि अगदी इंधनाच्या विक्रीतही संधी मिळणार आहे, असे कळते.
मोठ्या प्रमाणात सहकारी पतसंस्थांना आर्थिक शाश्वतता प्राप्त करण्यासाठी मदत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने याबाबत पाऊले उचलली जात आहेत.
बाणावलीमधील खराब रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सांतान परेरा यांनी PWD विभागाला बाणावलीजवळील बायपासवर काम सुरू करण्यासाठी तातडीने सुरवात करण्याची मागणी केली आहे.
दांडो सांगे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने टेलिफोनच्या खांबाला धडक दिली. पेप्सी कंपनीच्या दिशेने जाणारा जड वाहतुकीचा ट्रक आणि फिश फॅक्टरीचे ट्रक रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जात असतात.त्यापैकीच कोणत्यातरी वाहनांची टक्कर झाली असल्याचे बोलले जात आहे
सोनसोडो कचरा प्रकल्पाचा बऱ्याच कालावधीपासून रखडला होता. तिथे साठवलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. येथील इतक्या वर्षांपासून साठवून ठेवलेला कचरा उचलण्याची आणि संबंधित कामांची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.