Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

LIC Fraud Goa: गोव्यात ‘एलआयसी’मध्ये 43 लाखांचा घोटाळा! संस्थेचे 30 लाखांचे नुकसान; अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

LIC Pension Fraud Goa: तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सात वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांद्वारे या रकमेचा अपहार करण्यात आला.

Sameer Panditrao

पणजी: ‘एलआयसी’च्या पेन्शन आणि ग्रुप स्कीम विभागात कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी गजेंद्रनाथ रतनबोली यांनी ४३.८० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सात वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांद्वारे या रकमेचा अपहार करण्यात आला. या व्यवहारांमध्ये काही त्रयस्थ व्यक्तींच्या खात्यांचा वापर करून निधी वळवण्यात आला आणि नंतर ती रक्कम रतनबोली यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचे दिसून आले.

या प्रकरणात एका स्थानिक व्यापाऱ्यासह काही अज्ञात व्यक्तींनाही आरोपी केले आहे. हे व्यवहार लक्षात आल्यानंतर तिघा लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ‘एलआयसी’कडे परत केली. तरीही संस्थेचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपी अधिकाऱ्याने गैरव्यवहार लपवण्यासाठी एलआयसीची नोंद असलेली वही आणि कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. फसवणूक, पदाचा गैरवापर, विश्वासभंग आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न आदी आरोपांखाली भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT