Goa Land Scam: कुचेली कोमुनिदादाची जागा, भलत्यानेच विकली तिसऱ्याला; एका वर्षानंतर तिघांना अटक

Goa Crime News: संशयितांनी फिर्यादी व इतरांची फसवणूक केल्याने पीडितांनी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दिली.
Illegal land sale Goa | Land fraud arrests Goa
Kucheli Comunidade land caseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: राज्य सरकारने संपादित केलेल्या कुचेली कोमुनिदाद जागेतील जमिनीचे भूखंड पाडून, ते कायदेशीररित्या नावावर करून देतो असे सांगून फिर्यादींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली.

या प्रकरणी राजा अँथनी, सुमित फडते व राजू मांद्रेकर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हा फसवणुकीचा प्रकार गेल्या वर्षी घडला होता. याप्रकरणी फिर्यादी रिंकी झा (कुचेली) व इतरांनी पोलिसांत तक्रार दिली. यावर कारवाई करीत म्हापसा पोलिसांनी वरील तिघाही संशयितांना अटक केली आहे.

Illegal land sale Goa | Land fraud arrests Goa
मराठीचा पोटशूळ, महापालिकेत कन्नड न बोलल्यास बजावली जाणार नोटीस; बेळगावात तुघलकी निर्णय

अशी झाली फसवणूक

१) संशयितांनी या भूखंडातील फिर्यादींना २७० चौरस मीटर जागा विकली होती. या बदल्यात फिर्यादींकडून संशयितांनी ९ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. मात्र, संशयितांनी ही जागा फिर्यार्दीच्या नावे करून दिली नाही.

२) संशयितांनी वरील भूखंडाचे हक्क तक्रारदाराच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केले जातील असे वचन दिले. मात्र, संशयितांनी फिर्यादी व इतरांची फसवणूक केल्याने पीडितांनी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दिली.

३) त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद केला. त्यानुसार वरील तिघांही संशयितांना म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली

Illegal land sale Goa | Land fraud arrests Goa
Sindhudurg Crime: देवाला तरी सोडा रे...! कणकवलीत दत्त मंदिरातून दत्ताच्या मूर्तीची चोरी

स्मशानभूमीसाठीची जागा

मध्यंतरी याच जागेतील राज्य प्रशासनाने कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण करून उभारलेली बेकायदा ३६ बांधकामे जमिनदोस्त केली होती. ही जागा सरकारने स्थानिक कोमुनिदादकडून स्मशानभूमी बांधण्यासाठी संपादित केली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com