
पणजी: स्टॉक मार्केटमधून मोठ्या परताव्याचे आमिष देऊन एकाला अडीच कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्रातून एकाला अटक केली आहे. संशयित व्यक्तीच्या खात्यात १३.५ लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे आढळून आले आहे.
मंदार एम चव्हाण (४५, रा. महाराष्ट्र ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2), आयटी कायदा, ६६ डी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित स्टॉक ब्रोकर असल्याचा दावा करत सासष्टी येथील व्यक्तीला संपर्क करुन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुवामा वेल्थ आणि इनव्हेस्टमेंट या कंपनीच्या माध्यमातून व्यक्तीला संपर्क साधण्यात आला. यानंतर त्याला एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले. त्याला मोठ्या परताव्याचे आमिष देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. संबधित व्यक्तीने संशयिताच्या खात्यात २.४५ कोटी रुपये ट्रान्सफर केले.
याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका खाते धारकाला महाराष्ट्रातून अटक केली आहे. संजय चव्हाण या संशयिताच्या खात्यात १३.५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात आढळून आले. याप्रकरणी इतर संशयितांचा तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर, सायबर गुन्हे शाखेरचे अक्षत आयुष, राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाला पोलिस उपनिरीक्षक मंदार गावकर देसाई, पोलिस कॉनस्टेबल विराज नार्वेकर, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय प्रभू वेर्लेकर यांनी केली. दीपक पेडणेकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सायबर फसवणुकीच्या घटनांपासून नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.