Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Pramod Sawant: ग्रामपंचायत व बिगर सरकारी संस्था वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचा विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले.

Sameer Amunekar

पणजी: ग्रामपंचायत व बिगर सरकारी संस्था वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचा विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. वाचनालयातील कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन मिळते. त्यांना निवृत्तीनंतरच्या लाभाची कोणतीही तरतूद नसल्याकडे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी आज सरकारचे विधानसभेत लक्ष वेधले होते. ते शून्य तासाला बोलत होते.

काब्राल म्हणाले, ही वाचनालये ग्रामपंचायती व बिगर सरकारी संस्थांकडून चालवली जातात. समर्पण भावनेतून हे कर्मचारी जनसेवा करत आले आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यात, फुलवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

सरकारने या वाचनालयांना अनुदान देण्याची योजना तयार केली. मात्र, त्यात महागाईशी सुसंगत अशी अनुदान वाढ करण्याची तरतूद केली नाही. परिणामी तुटपुंज्या वेतनावर काम करण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करावे. वाचनालय अधिभार सरकार वसूल करते यातून याची व्यवस्था करावी.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की अशी १५३ वाचनालये आहेत. त्यांना सरकार अनुदान देते. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे यात दुमत नाही. त्यामुळे सुधारित अनुदानाची योजना लागू करताना वेतनवाढीची तरतूद केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT