Goa: राज्‍यात तब्बल 1,14,840 पाळीव आणि मोकाट कुत्रे! 9,459 भटकी गुरे; पशुसंवर्धन खात्याची माहिती

Goa animal census 2025: नव्‍या गणनेनुसार राज्‍यात ८६,९७६ पाळीव आणि २७,८६४ मोकाट असे मिळून १,१४,८४० कुत्रे आहेत. भटक्‍या गुरांची संख्‍या ९,४५९ इतकी असून, राज्‍यातील सर्वच प्राण्‍यांची एकूण संख्‍या २,५७,१४० इतकी असल्‍याची पशुसंवर्धन खात्यानं दिलीय.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : नव्‍या गणनेनुसार राज्‍यात ८६,९७६ पाळीव आणि २७,८६४ मोकाट असे मिळून १,१४,८४० कुत्रे आहेत. भटक्‍या गुरांची संख्‍या ९,४५९ इतकी असून, राज्‍यातील सर्वच प्राण्‍यांची एकूण संख्‍या २,५७,१४० इतकी असल्‍याची माहिती पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्‍याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्‍न विचारला होता. गोव्‍यासह देशभरात नुकत्‍याच झालेल्‍या प्राणी आणि पक्ष्‍यांच्‍या गणनेनुसार, राज्‍यात प्राणी आणि पक्ष्‍यांची संख्‍या किती आहे, असा प्रश्‍न आमदार सरदेसाई यांनी विचारला होता. त्‍यावरील उत्तरात गोव्‍यात नोव्‍हेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत प्राणी आणि पक्ष्‍यांची गणना करण्‍यात आली.

Goa
Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

त्‍यातून राज्‍यात प्राण्‍यांची एकूण संख्‍या १,४५,६१४ इतकी असल्‍याचे उघड झाल्‍याचे सांगत मंत्री हळर्णकर यांनी त्‍याबाबतची आकडेवारीही सादर केली आहे. राज्‍यात कुत्र्यांच्‍या प्रजननाबाबत काही कायदे आहेत का, या प्रश्‍नावर केंद्र सरकारच्‍या प्राण्यांच्या संदर्भातील क्रूरता प्रतिबंधक (कुत्र्यांचे प्रजनन आणि विपणन) नियम, २०१७ गोव्‍यातही लागू आहे. या कायद्यानुसार कुत्रे पाळणाऱ्यांना राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे अनिवार्य असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

सातजणांनीच केली कुत्रे पाळल्‍याची नोंद

राज्‍यात आतापर्यंत किती जणांनी कुत्रे पाळल्‍याची नोंदणी केली आहे आणि बेकायदा कुत्रे पाळलेल्‍या किती जणांवर कारवाई केली, असेही प्रश्‍न आमदार सरदेसाई यांनी विचारले होते. त्‍यावर आतापर्यंत सातजणांनी कुत्रे पाळल्‍याची नोंदणी केली आहे.

Goa
Goa Assembly: कंत्राटी शिक्षकांना कायम करण्‍याची योजना लवकरच, मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टतच सांगितलं; वाचा दिवसभरातील घडामोडी

त्यांनी बॉक्‍सर, रॉटविलर, लॅब्राडोर, जॅक रुसेल आदी जातींचे कुत्रे पाळले आहेत. नोंदणीशिवाय कुत्री पाळल्‍याबाबत एकही गुन्‍हा नोंद झालेला नाही. पण, प्राण्‍यांसोबत क्रूरतेने वागल्‍याबाबत साळगावातील एकाविरोधात गुन्‍हा नोंद झाल्‍याचेही मंत्री हळर्णकर यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com