Cm pramod sawant speech Dainik Gomantak
गोवा

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

CM Pramod Sawant: विकसित भारतासोबतच गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी एकत्रितपणे कार्य करणे, गोंयकारपण सांभाळणे हीच एकात्मतेची खरी शक्ती असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जो हरित, स्वच्छ गोवा आम्हांला दिला, तो आमच्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आमची जबाबदारी आहे. विकसित भारतासोबतच गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी एकत्रितपणे कार्य करणे, गोंयकारपण सांभाळणे हीच एकात्मतेची खरी शक्ती असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ते गोवा मुक्तिदिन राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव, मुख्य सचिव व्ही. कान्दावेलू, महाअधिवक्ता देविदास पांगम, पोलीस महासंचालक आलोक कुमार, अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन रायकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सुवर्णपदक प्राप्त अधिकाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले तसेच पथसंचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले.

दरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, १९६१ पासून आतापर्यंत गोव्यात जी सरकारे आली त्यांनी गोव्याचा विकास केला. गोवा देशाच्या तुलनेत १४ वर्षे उशिरा मुक्ती मिळून देखील साक्षरता, शिक्षण, आरोग्य, साधनसुविधा, हर घर जल, हर घर बिजली आदी व इतर अनेक उपक्रमात देशात अव्वल स्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसे देशाला पंचप्रण दिले आहेत, तसेच आम्हांला गोवा विकसित करण्यासाठी पंचप्रण अंगीकारावे लागणार आहेत. त्याचे पालन प्रत्येक गोमंतकीयांनी करणे हे २०३७ पर्यंत स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खालील पंचप्रण पाळण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री पोलिस सुवर्णपदक

पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर

पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार

महिला पोलिस निरीक्षक - सुदीक्षा नाईक

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक - सुभाष मालवणकर

हेड कॉन्स्टेबल - भालचंद्र सावंत

हेड कॉन्स्टेबल - मेल्विन डायस

पोलिस कॉन्स्टेबल- अमरदीप चौधरी

मुख्यमंत्री अग्निशमन सेवा पदक

अग्निशमन अधिकारी नीलेश फर्नांडिस

अग्निशमन जवान

जंगा गोहर

अग्निशमन जवान

अनिकेत आमोणकर

अग्निशमन जवान

अविनाश गावकर

मुख्यमंत्री गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा सुवर्णपदक

राम कांबळी

(वाहन चालक, गृहरक्षक )

विद्या तलवार

(महिला गृहरक्षक स्वयंसेवक)

रुपेश पर्वतकर

(नागरी सुरक्षा वार्डन)

ॲड. हर्षा नाईक

(नागरी सुरक्षा)

१ विकसित भारतासोबत स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयांनी कटिबद्ध व्हावे.

२ गुलामी आणि परावलंबी मानसिकता झटकून द्यावी.

३ गोव्याच्या समृद्ध दायज (वारशाचा) अभिमान बाळगा.

४ गोंयकारपण सांभाळणे ही एकात्मतेची खरी शक्ती.

५ स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित गोवा राखण्यासाठी आपल्या कर्तव्याचे देखील भान राखावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:सकाळी 10 पर्यंत पाळीत सर्वाधिक, तर ताळगावमध्ये सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT