'रोमिओ लेन'वर बुलडोझर ॲक्शन! मालक फरार होताच CM सावंतांचे फर्मान, पाडकाम पथके सज्ज; कोणत्याही क्षणी होणार भुईसपाट

Romeo Lane Demolition: या घटनेनंतर गोव्यातील बेकायदेशीर आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अत्यंत कठोर कारवाईचे आदेश दिले
Romeo Lane Goa
Romeo Lane GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या घटनेत २5 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गोव्यातील बेकायदेशीर आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अत्यंत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

वागेतोर येथील 'रोमिओ लेन' पाडण्याचे आदेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्या मालकीच्या वागेतोर येथील 'रोमिओ लेन' बीच शॅक आणि संबंधित क्लबचे बांधकाम त्वरित पाडण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, प्रशासकीय अधिकारी आणि पाडकाम पथके वागेतोर येथील क्लबवर कोणत्याही क्षणी कारवाई सुरू करण्यासाठी सज्ज असून या कठोर कारवाईमुळे गोव्यातील अवैध बांधकामे आणि 'राजकीय वरदहस्ताने' चालणाऱ्या क्लब्सना स्पष्ट संदेश मिळालाय.

Romeo Lane Goa
Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

मालक देश सोडून पसार; आता इंटरपोलची मदत

हडफडे येथील क्लबला आग लागल्यानंतर काही तासांतच क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी भारतातून पळ काढल्याचे उघड झाले आहे. ते थायलंडमधील फुकेत येथे फरार झाले आहेत. गोवा पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध 'लूक आऊट सर्कुलर' जारी केले असून या दोन्ही मालकांना तातडीने पकडण्यासाठी आता इंटरपोलची मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली.

देश सोडून पळ काढल्याने त्यांचा तपास टाळण्याचा स्पष्ट उद्देश होता, असे पोलिसांनी म्हटलेय. या दुर्घटनेनंतर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्लबच्या व्यवस्थापकासह काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com