Ramesh Tawadkar Delhi Tour  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सभापती रमेश तवडकरांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा!

Goa State Cabinet: राज्य मंत्रिमंडळात परतण्यास इच्छुक असलेले विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी तीन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या

गोमन्तक डिजिटल टीम

राज्य मंत्रिमंडळात परतण्यास इच्छुक असलेले विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांचा दिल्ली दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. आज सकाळी त्यांनी दिल्ली गाठली आणि तीन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या.

उद्याही ते दिल्लीत असतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळ फेररचनेबाबत चर्चा केल्यास २४ तास उलटण्यापूर्वीच तवडकर यांनी दिल्ली (Delhi) गाठल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.

आदिवासी कल्याण मंत्री म्हणून तवडकर यांनी अनेक योजना तयार केल्या. पक्षाने त्यांच्याकडे सभापतिपदाची जबाबदारी सोपवली. त्यावेळी त्यांनी आदिवासी कल्याण खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवावे, अशी अट घातली होती. त्यानुसार आजही ते खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे.

मध्‍यंतरी आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर व कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त ध्वनिफितीमागे तवडकर यांच्या सूचनेवरून प्रियोळ मतदारसंघात आयोजित कार्यक्रम कारणीभूत होता, अशी चर्चा होती.

या वादानंतर गावडे यांना वगळून तवडकरांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशी चर्चा रंगली होती. दरम्‍यान, तवडकर यांनी आदिवासी कल्याणमंत्री जुआल ओरम, मंत्री दुर्गादास उईके, मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली.

रमेश तवडकर, सभापती

नवे मंत्रिमंडळ सत्तारूढ झाल्यावर नव्या मंत्र्यांच्या भेटींसाठी दिल्लीत आलो आहे. लोकोत्सव आणि आदिवासी समाजासाठी केंद्रीय योजनांचा लाभ हवा असतो. त्यासाठी या गाठीभेटी आहेत. मला कधी लॉबिंग करावे लागलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Goa Live Updates: नाणूस येथील सभागृहाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT