Chandrakant Shetye  Dainik Gomantak
गोवा

Goa Legislative Assembly : आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी वाढविण्याची गरज : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्येंचा प्रश्‍न

MLA Chandrakant Shetye : स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पुरेसे पैसेच नसतात

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, धोकादायक ठरणारी झाडे कापण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी पंचायत किंवा पालिकांना देतात.

या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पुरेसे पैसेच नसतात, त्यामुळे झाडे कापणार तरी कोण, असा प्रश्न डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. सरकारने पालिकांना ५० हजार रुपये तर पंचायतींना दिलेले २५ हजार रुपये अपुरे आहेत, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो म्हणाल्या की, पंचायतीला दिलेले २५ हजार रुपये संपले. आता आणखीन झाडे कापण्यासाठी निधी कोण देणार. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी एक झाड कापण्यासाठीच २४ हजार रुपये खर्च आल्याची माहिती दिली.

मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले, लोक घर बांधतात. घरासभोवती माड, आंब्याचे झाड लावतात. आंबे खातात, शहाळी पितात, नारळ खातात. तर मग असे झाड पडले तर आमदाराला दूरध्वनी का करतात. खासगी झाडे सरकारने का हटवावीत. याबाबत स्पष्टता हवी.

यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिका व पंचायतींना दिलेल्या निधीत यंदाच वाढ केल्याचे नमूद केले. ते म्हणाले, अभूतपूर्व असा पाऊस व वारा यंदा झाला. त्याचाही विचार केला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीत वाढ करण्याच्या मागणीचा सरकार विचार करेल.

उपजिल्हाधिकारी निधी देऊ शकतात

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले की, डिचोलीत २०० झाडे आज पडली आहेत. काल २२ झाडे पडली होती. झाडे ही घरे, वाहने, तारा यांच्यावर पडल्याने होणारे नुकसान तर वेगळेच आहे. झाडे पडण्यापूर्वी अशी धोकादायक झाडे हटवण्यासाठी तरतूद केली पाहिजे. उपजिल्हाधिकारी आदेश देतात; पण अंमलबजावणी करण्यासाठी निधी नाही, अशी स्थिती आहे.

२ याला उत्तर देताना महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, धोकादायक झाडे हटवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. पालिका कायद्याच्या कलम १७७ (ड) आणि २१५ (३) नुसार तसे करता येते. पंचायतीला पंचायतराज कायद्याच्या कलम ७६ नुसार अधिकार आहेत. पालिका व पंचायतीला दिलेला निधी संपल्यास उपजिल्हाधिकारी ५ लाख रुपयांपर्यंतचा निधी देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT