Goa Land Grab Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grab Scam: गोव्यातील जमिन घोटाळा प्रकरणांचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव यांच्या एकसदस्यीय आयोगाकडून चौकशी पूर्ण

Akshay Nirmale

Goa Land Grab Scam: गोव्यातील विविध ठिकाणच्या जमिनी हडपल्याप्रकरणी याबाबत तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली होती. तसेच या प्रकरणांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव यांचा एक सदस्यीय आयोग नेमण्यात आला होता.

दरम्यान, माजी न्यायमूर्ती जाधव यांनी या चौकशीचा अहवाल आज, बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द केला.

गेल्या महिन्यात ही चौकशी पूर्ण झाली होती. तसे स्वतः जाधव यांनीच सांगितले होते. त्यामुळे ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरवातीला ते अहवाल सरकारकडे देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

पत्रकारांशी बोलताना निवृत्त न्यायमूर्ती जाधव म्हणाले की, मी केवळ दहा महिन्यांमध्ये अहवाल दिला आहे. आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. त्यांनी अहवालातील तपशील सांगणे टाळले. भविष्यात जमिनी वाचाव्यात या अनुषंगाने शिफारसी केल्या आहेत. अन्यथा घोटाळेबाजांकडून त्या विकल्या जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, जमिन हडपण्यात 7 मुख्य घोटाळेबाज यात सामिल आहेत. ज्यावर कुणाची मालकी नाही अशा तसेच सरकारी जमिनी विकण्याचे प्रयत्न त्यांनी केले. नो मॅन्स लँड अशा जा जमिनी आहेत ते राज्य सोडून बाहेर गेले आहेत.

मुख्य सचिवांना राज्यभरातील नो मॅन्स लँड निश्चित्त करण्यास सांगितले आहे. अशा जमिनी सरकार ताब्यात घेईल. अशा जमिनींवर दावा करण्यासाठी लोकांना ठराविक वेळ दिला जाईल. गोवा सरकार गोव्यातील जमिनींच्या संरक्षणाबाबत गंभीर आहे.

आवश्यक जमिन सुधारणा कायदे प्राधान्याने केले जातील, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या अहवालात जमीन बळकावण्याच्या सर्व प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासह सरकार अशा घटनांची पुनरावृत्ती होण्यापासून कशी रोखू शकते याची शिफारसी करण्यात आल्याचे समजते.

अहवालातील शिफारशी राज्याच्या विधानसभेसमोर मान्यतेसाठी ठेवल्या जातील. जानेवारीमध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. जाधव यांनी 10 जमिनींची पाहणी केली होती आणि प्रकरणांची सुनावणी घेतली.

जमीन बळकावण्यासंदर्भात 200 हून अधिक याचिका प्राप्त झालेल्या या टीमने राज्यभरात पसरलेल्या 100 हून अधिक मालमत्तांची चौकशी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT