Goa News | Kundaim Chitrapur Math Dainik Gomantak
गोवा

Goa News: चित्रापूर मठाचा रहिवासी दाखला रद्द करा!

Goa News: ग्रामसभेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

Goa News: कुंडईतील चित्रापूर मठाच्या प्रश्‍नावरून काल झालेल्या कुंडई ग्रामसभेत गदारोळ झाला. या मठावरून झालेल्या वादळी चर्चेनंतर मठाला पंचायतीने दिलेला रहिवासी दाखला त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली व त्यासंबंधीचा ठरावही संमत झाला. विशेष म्हणजे सातपैकी पाच पंच सदस्यांनी ग्रामस्थांच्या मागणीला होकार दिला, तर दोन पंच सदस्य गप्प राहिले. ग्रामसभेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

चित्रापूर मठाचे काल रविवारी उद्‍घाटन झाले. या मठाला कुंडई ग्रामस्थांचा विरोध आहे. मात्र, मठाला रहिवासी दाखला दिला गेला. त्यामुळे ग्रामसभेत हा गदारोळ झाला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा दाखला फार्म हाउसच्या नावावर घेण्यात आला आहे, पण उद्‍घाटन मात्र मठाचे करण्यात आले आहे.

मठ बांधकामाच्या ठिकाणी मोठी इमारत बांधण्यात आली आहे. त्याबद्दल पंचायतीत विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तरीही रहिवासी दाखला देण्यात आल्याने ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. कुंडई (Kundaim) येथील विद्यालयाजवळ मोबाईल टॉवर उभारण्यासाठी मोठा खड्डा मारण्यात आला.

मात्र, ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेतल्यानंतर हा खड्डा तसाच ठेवण्यात आला. हा प्रश्‍नही चर्चेला आला असता संबंधितांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे पंचायत मंडळाने स्पष्ट केले. कचरा शेडचाही विषय ग्रामसभेत चर्चेला आला. अन्य काही विषयांवर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले.

पाच सदस्यांचा ठरावाला पाठिंबा

हा रहिवासी दाखला मागे घेण्यासाठीचा ठराव मांडला असता ग्रामस्थांचा त्याला पाठिंबा मिळाला. सातपैकी सरपंच सर्वेश गावडे, उपसरपंच उज्वला नाईक, पंच सदस्य संदीप जल्मी, रूपेश कुंडईकर व दीपाली गावडे यांनी या ठरावाला समर्थन दिले, तर विश्‍वास फडते व मनिषा नाईक हे दोन पंच सदस्य तटस्थ राहिले. यासंबंधीची पुढील कार्यवाही पंचायत सचिवाने करावी असे सूचविण्यात आले.

बेरोजगारीचा प्रश्नही गाजला

कुंडई पंचायत (Panchayat) क्षेत्राच्या परिघात असलेल्या औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. मात्र, त्यात स्थानिकांना संधी दिली जात नाही. परप्रांतीय लोकांना अशा कंपन्यांत बिनधास्त घेतले जात असल्याने ग्रामस्थांनी आवाज चढवला. त्यावर पंचायत क्षेत्रातील शिक्षित युवकांची यादी तयार करून द्या, ती विविध कंपन्यांना देऊ असे पंचायतीतर्फे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT