गोवा: राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गिरी सुकुर येथे महामार्गावर कारच्या अपघातात महाराष्ट्रातील 8 प्रवासी जखमी झाले आसून त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. गोवा पोलिसांनी राज्यभरातील रस्त्यांवरील एकूण 39 अपघात प्रवण क्षेत्रे आणि ब्लॅक स्पॉट्स म्हणून घोषित केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर 10 ब्लॅक स्पॉट आहेत.
(Fatal accident on highway at Giri-Sukur, 8 passengers from Maharashtra injured)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर 10 ब्लॅक स्पॉट आहेत आणि उर्वरित राज्य महामार्ग आणि इतर रस्त्यांवर आहेत. रस्ता सुरक्षा भागधारकांनी परवाना प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कडून राज्याच्या रस्त्यांवरील वाढत्या अपघाती मृत्यूच्या समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्व यंत्रणांची बैठक घेतली.
राज्यातील रस्त्यांवर दररोज अपघाती मृत्यू होत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्व यंत्रणांची बैठक घेतली. बैठकीदरम्यान, 39 अपघात प्रवण क्षेत्रे आणि मृत्यूचे साक्षीदार असलेल्या ब्लॅक स्पॉट्सचा अहवाल ठेवण्यात आला. या अहवालात फोंड्यात जास्तीत जास्त 11 ठिकाणे असून, त्यानंतर कळंगुटमध्ये 6 अपघातप्रवण क्षेत्र आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. गोवा पोलिसांच्या वाहतूक शाखेने स्पॉट्सचे तपशीलवार विश्लेषण केले आहे आणि सार्वजनिक बांधकाम खातं आणि संबंधित संस्थांना अपघातांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी उपाय सुचवले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.