Goa Governor: गोवा राज्यपालांकडून दरबार हॉलमध्ये ज्येष्ठांना स्नेहभोजन!

Goa Governor: राज्यातील वेगवेगळ्या वृद्धाश्रमांतील ज्येष्ठांना राजभवनच्या दरबार हॉलमध्ये स्नेहभोजन दिले.
Goa Governor | Durbar Hall
Goa Governor | Durbar HallDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Governor: राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई (Governor P.S. Sreedharan Pillai) यांनी काल राजभवनच्या दरबार हॉलमध्ये ज्येष्ठांना स्नेहभोजन देऊन जनतेजवळ जाण्याची आणखी एक संधी साधली आहे. भव्य राजवाड्यातून बाहेर पडून सामान्य माणसांचे दुःख वेचणारा राजा हा सामान्यजणांना प्रिय होता. म्हणूनच सिद्धार्थचा गौतम आजही लोकांना भावतो.

पिल्लई हेही घटनात्मक स्तरावरची आपली निवड सार्थकी लावताना दिसत आहेत. काल त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या वृद्धाश्रमांत आणि ‘डे केअर’मध्ये असणाऱ्या ज्येष्ठांना राजभवनच्या दरबार हॉलमध्ये स्नेहभोजन दिले.

Goa Governor | Durbar Hall
Goa Silly Souls Cafe And Bar प्रकरणी इराणी कुटुंबीयांच्या बचावासाठी अबकारी कायद्यात दुरुस्ती!

एरवी येथे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित लोकच मेजवानी झोडतात. पण आज वयाच्या 70, 80 कडे  झुकलेले ज्येष्ठ आपल्या थरथरत्या हातांनी आणि मंदावलेल्या पावलांनी राजभवन प्रसादाची भव्य-दिव्यता, कलाकुसर, गालीचे आणि रेड कार्पेट्स पाहात होते.

तसेच, यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने  ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या विविध वस्तू दिल्या. यासाठी डॉ. रूपिनो मोंतेरो, डॉ. शेखर साळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सीएसआर फंडामधून मदत-

राज्यपाल डायलिसिस कराव्या लागणाऱ्या रुग्णांना व कर्करोग (Cancer) पीडितांना विविध पातळीवर मदत करत आहेत. यातही सरकारी पैशांना फाटा देऊन ते विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’मधून पैसे उभे करून आर्थिक मदतीचा हात पुढे करत आहेत. आतापर्यंत शेकडो रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. संपूर्ण गोवा यात्रेच्या निमित्ताने ते स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Goa Governor | Durbar Hall
फातोर्ड्यात सर्वोत्तम प्रतिसाद, जनता बदल घडवेल : दामू नाईक

भव्य-दिव्यतेचा पहिलाच अनुभव-

आपण येथे पहिल्यांदाच जेवण घेत असल्याचे अनेक ज्येष्ठांनी सांगितले. 80 वर्षांचे दीनानाथ तारी म्हणाले, राज्यपालांचा हा पुढाकार ज्येष्ठांसाठी आपुलकीचा हातच आहे. तर पंच्याहत्तरीकडे झुकलेले देऊ पळ म्हणाले, अशा प्रकारचे प्रेम मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे. या भव्य-दिव्यतेचा अनुभव दिल्याबद्दल राज्यपालांचे आभार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com