Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: काटेकणगीच्या शेतीला ग्रहण! लागवड वाढली, तरी उत्पादन घटले; दिवाळीच्या मागणीवर परिणाम होणार?

Katekangni Cultivation in Goa: गोव्यात खरीप हंगामात लागवड होणाऱ्या आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या काटेकणगी पिकाच्या लागवड क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात खरीप हंगामात लागवड होणाऱ्या आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या काटेकणगी पिकाच्या लागवड क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, हवामान बदल आणि अन्य कारणांमुळे उत्पादनात घट झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

२०२१-२२ मध्ये ८० हेक्टर क्षेत्रावर लागवड होऊन २३१ टन उत्पादन मिळाले होते. २०२३-२४ मध्ये लागवड ८८ हेक्टरवर पोहोचली आणि उत्पादन २७५ टन झाले. २०२४-२५ मध्ये क्षेत्र ९४ हेक्टरवर गेले; मात्र उत्पादन २६६ टनांवर घसरले. चालू वर्षी ९३ हेक्टर क्षेत्रातून २६१ टन उत्पादन मिळाले आहे. हेक्टरी उत्पादकताही ३.१२ टनांवरून २.८० टनांवर आली आहे.

गोमंतकीय खाद्यसंस्कृतीत काटेकणगीला विशेष स्थान आहे. दिवाळीच्या काळात पोहे, उकडलेली काटेकणगी व विविध गोड पदार्थांसाठी तिची मागणी वाढते. सध्या पणजी बाजारात काटेकणगीची विक्री प्रतिकिलो २०० रुपये दराने सुरू आहे. सुधारित वाण, कीड व पाणी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास उत्पादनवाढीला मदत होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: दिवाळी तोंडावर पावसाचा जोर कायम; डिचोलीत घरावर कोसळली आंब्याची फांदी, बाजारपेठेत धावपळ!

Budh Gochar 2026: पुढील 22 दिवस सोन्याचे! बुधाच्या नक्षत्र बदलाने 'या' राशी होणार मालामाल; करिअरमध्ये मिळणार उत्तुंग यश

Crime News: गर्लफ्रेंडच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, भेटायला बोलावलं अन् बेल्टने गळा आवळला; 17 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, तिघे ताब्यात

Goa SIR: गोव्यात 1.27 लाख मतदारांची नावे वगळली; मुस्लिम समाजात सर्वाधिक 20 टक्के कपात

IPL 2027 पूर्वी मोठी उलथापालथ! हार्दिक पांड्या पंजाबकडून, तर अर्शदीप मुंबईकडून खेळणार; मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT