Goa Karnataka Island Dispute Dainik Gomantak
गोवा

'ती' 16 बेटे गोव्याचीच! मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाचा दावा फेटाळला; महसूल सचिवांना दिले तातडीने चौकशीचे आदेश

Goa Karnataka Island Dispute: कर्नाटकाने दावा केलेल्या १६ बेटांच्या मालकीसंबंधीची जुनी कागदपत्रे महसूल खात्याकडे उपलब्ध आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कर्नाटकाने दावा केलेल्या १६ बेटांच्या मालकीसंबंधीची जुनी कागदपत्रे महसूल खात्याकडे उपलब्ध आहेत. त्‍यामुळे हा विषय महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ही बेटे कर्नाटकाच्या सागरी हद्दीत येतात की नाहीत, याने काही फरक पडत नाही. वारसा हक्काने ही बेटे गोव्याला मिळालेली असून ,त्यावर गोव्याचाच पूर्ण अधिकार आहे. गोवा संघप्रदेश असताना संबंधित कागदपत्रे तयार करण्यात आली होती .

आणि राज्य झाल्यानंतरही ती प्रशासनाच्या ताब्यात आहेत. या बेटांच्या मालकीकडे दुर्लक्ष झालेले नाही असे स्पष्ट करत मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले की, बहुतांश बेटे भरतीच्या वेळी पाण्याखाली जातात. या बेटांच्या व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करून पर्यावरणपूरक व शाश्वत विकास साधण्याचा सरकारचा मानस आहे.

कर्नाटकातील कोणत्याही नेत्याच्या वक्तव्यामुळे काहीही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट करत मुख्‍यमंत्री म्हणाले, सागरी पोलिस हद्द निश्चित करण्याचा अधिकार कर्नाटकाला नाही. देशातील सर्व राज्यांच्या महसुली सीमा निश्चित झालेल्या असून, कर्नाटक लगत असली तरी या बेटांची मालकी गोव्याकडेच आहे आणि ती कायम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT