Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Karnataka Island Dispute: गोव्याला पाहिजे ते करू द्या; कर्नाटकलगतच्या ‘त्या’ १६ बेटांचा ताबा गोव्याला देणार नाही, असे कारवारचे पालकमंत्री व कर्नाटकाचे बंदर व मत्स्योद्योगमंत्री मन्कल वैद्य यांनी आज स्पष्ट केले.
Goa Karnataka Island Dispute
Goa IslandDainiak Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याला पाहिजे ते करू द्या; कर्नाटकलगतच्या ‘त्या’ १६ बेटांचा ताबा गोव्याला देणार नाही, असे कारवारचे पालकमंत्री व कर्नाटकाचे बंदर व मत्स्योद्योगमंत्री मन्कल वैद्य यांनी आज स्पष्ट केले. ही सर्व बेटे कर्नाटकाच्या सागरी हद्दीत असल्याची भूमिका कारवार प्रशासनाने घेतली आहे. कारवारच्या उपायुक्त लक्ष्मी प्रिया यांच्या मते, माजाळीजवळील एका बेटाव्यतिरिक्त इतर बेटांच्या मालकीबाबत कोणताही वाद नाही. त्या बेटाबाबत केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, अद्याप मालकीबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.

दरम्यान, कर्नाटकाने या १६ बेटांचा ताबा आपल्याकडे मागितल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इंचभरही जागा कर्नाटकाला देणार नाही, तसेच केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करू, असे जाहीर केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वैद्य यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, कर्नाटकाने या बेटांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. कर्नाटक सरकारने सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्चाचा पर्यटन विकासाचा सविस्तर आराखडा तयार केला असून, प्रत्येक बेटासाठी स्वतंत्र विकास योजना आखली आहे. ही बेटे कर्नाटकाची असल्याने ती गोव्याला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्नाटक सरकार गेली दोन वर्षे यावर काम करत असून, गोवा सरकारला आता जाग आली आहे, असेही त्यांनी म्हटले.

Goa Karnataka Island Dispute
Goa Island Management Plan: द्वीप व्यवस्थापनात होणार ‘त्या’ बेटांचा समावेश! राज्य सरकारने ठोकले पाय; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला पाठवणार पत्र

नावांसाठी समितीही स्थापन

कर्नाटक सरकारने कारवार तालुक्यातील मध्यलिंगडा द्वीप, मोनेरगुड्डा द्वीप, देवगड १, देवगड २ तसेच भटकळ तालुक्यातील हाग द्वीप आणि किरीकोंडा या बेटांना नव्याने सर्वे क्रमांक दिले आहेत. मच्छीमार ज्या नावांनी बेटांना ओळखतात, ती नावे अधिकृत करण्यासाठी कर्नाटक सरकारने समिती स्थापन केली आहे.

या बेटांना भू-महसुली नोंदीनुसार सर्वे क्रमांक देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कर्नाटक सागरी पोलिसांकडे या बेटांची नोंद कर्नाटकाची बेटे अशी आहे. त्यानुसार, त्या बेटांची मालकी कारवार (उत्तर कन्नड) जिल्हा प्रशासनाकडे आहे. अलिकडे झालेल्या बैठकीतही याविषयी माहिती घेतल्यावर असेच किनारी पोलिस अधीक्षकांकडून सांगण्यात आले. उत्तर कन्नड जिल्ह्यात एकूण ६३ बेटे असून, त्यापैकी काहींचाच विकास केला जात आहे.

- लक्ष्मी प्रिया, (कारवार, उपायुक्त)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com