Goa Kala Academy: Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy: कला अकादमीच्या कामाचे पुन्‍हा होणार स्‍ट्रक्‍चरल ऑडिट, 'पीडब्‍ल्‍यूडी'चा मोठा निर्णय

Kala Academy: कला अकादमीच्‍या नूतनीकरण कामाचे पुन्‍हा एकदा स्‍ट्रक्‍चरल ऑडिट करण्‍याचे सार्वजनिक बांधकाम खात्‍याने (पीडब्‍ल्‍यूडी) निश्‍चित केले असून, त्‍यासंदर्भात आयआयटी चेन्‍नईशी चर्चा सुरू आहे.

Sameer Amunekar

पणजी: कला अकादमीच्‍या नूतनीकरण कामाचे पुन्‍हा एकदा स्‍ट्रक्‍चरल ऑडिट करण्‍याचे सार्वजनिक बांधकाम खात्‍याने (पीडब्‍ल्‍यूडी) निश्‍चित केले असून, त्‍यासंदर्भात आयआयटी चेन्‍नईशी चर्चा सुरू आहे. ‘आयआयटी चेन्‍नई’कडून नकार मिळाल्‍यास इतर संस्‍थेकडून स्‍ट्रक्‍चरल ऑडिट करून घेतले जाणार असल्‍याची माहिती ‘पीडब्‍ल्‍यूडी’चे अभियंता वल्लभ पै यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

कला अकादमीच्‍या नाट्यगृहातील रंगमंच, साऊंड आणि प्रकाशयोजनेचे काम केलेल्‍या मुंबईतील ‘टेकटॉन’ या कंपनीने ९० लाखांच्‍या कामांमध्‍ये त्रुटी ठेवल्‍याचे ‘पीडब्‍ल्‍यूडी’च्‍या अभ्‍यासातून समोर आलेले होते.

त्‍यानंतर यासंदर्भात स्‍थापन केलेल्‍या रॉजर ड्रेगो, शीतल तळपदे आणि राजन भिसे यांच्‍या सल्लागार समितीने मंगळवारी पुन्‍हा नाट्यगृहाची पाहणी केली असून, त्‍यांच्‍याकडून पुढील अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

यासंदर्भात २० जुलै रोजी बैठक होणार असल्‍याचे पै म्‍हणाले. सद्यस्‍थितीत ‘टेकटॉन’ कंपनीकडून ९० लाख वसूल करून, त्‍यांची सरकारकडे ठेव असलेले सात कोटी रुपये कंपनीला न देण्‍याचा निर्णय ‘पीडब्‍ल्‍यूडी’ने घेतल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्‍यान, कला अकादमीची वास्‍तू राज्‍याच्‍या कला आणि संस्‍कृतीचे माहेरघर आहे. त्‍यामुळे या वास्‍तूत कोणत्‍याही प्रकारच्‍या त्रुटी राहू नयेत, यासाठीच पुन्‍हा एकदा या वास्‍तूचे स्‍ट्रक्‍चरल ऑडिट करण्‍याचे ‘पीडब्‍ल्‍यूडी’ने ठरवले आहे. त्‍यासंदर्भात आयआयटी चेन्‍नईशी चर्चाही सुरू आहे. पण, त्‍यांच्‍याकडून नकार आल्‍यास या कामासाठी इतर संस्‍थेची नेमणूक करण्‍यात येणार असल्‍याचेही पै यांनी स्‍पष्‍ट केले.

मुख्‍यमंत्र्यांचे कामांकडे बारीक लक्ष

विविध घडामोडींनंतर आमदार गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्‍यानंतर कला अकादमीही त्‍यांच्‍या हातून पूर्णपणे निसटली आहे. त्‍यानंतर कला अकादमीचे अध्‍यक्षपद मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍वत:कडे राखून ठेवले असून, आगामी काळात अकादमीत होणाऱ्या कामात कोणत्‍याही पद्धतीच्‍या त्रुटी राहू नयेत, याकडे मुख्‍यमंत्री बारीक लक्ष ठेवून असल्‍याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT