Kadamba launches App Dainik Gomantak
गोवा

Kadamba launches App: ‘कदंब’च्या प्रवाशांची गैरसोय टळणार

नवे ॲप : बस सध्या कुठे आहे, कधी पोहोचणार, याची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

Kadamba launches App:

प्रवाशांची गैरसोय टाळून त्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने कदंब महामंडळ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन ॲप उपलब्ध करणार आहे. या ॲपमुळे प्रवाशांना आवश्‍यक असलेली बस सध्या कुठे आहे, स्थानकावर ती पोहोचण्याची वेळ आणि इतर माहिती मिळू शकेल.

त्यामुळे पेडणेत एका वृद्ध महिलेवर गुदरलेला बाका प्रसंग पुन्हा उदभवणार नाही, असे कदंब महामंडळाचे व्यवस्थापक संजय घाटे म्हणाले.

कदंब महामंडळाकडे अतिरिक्त बसेस नसल्याने शेवटची बस चुकलेल्या महिलांसाठी पर्यायी बसेसची गरज आता उदभवू लागली आहे. अनेक महिला रात्री उशिरापर्यंत कामावर असतात. त्यामुळे त्यांना घरी घेऊन जाणारी शेवटची बस चुकण्याची शक्यता असते. अशा नोकरदार महिलांना टॅक्सी भाड्याने घेणे परवडत नाही. त्यामुळे घरी परत कसे जायचे, हा मोठा प्रश्न असतो.

विशेष म्हणजे, सरकारने एक घोषणा केली होती की, ज्यावेळी कोणत्याही स्थानकावर बस उपलब्ध नसल्यास परिसरातील पिंक फोर्स महिलांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी घेईल.

हल्लीच कदंब बस न आल्याने पेडणे येथील बसस्थानकात अडकून पडलेल्या एका वृद्ध महिलेला पिंक फोर्सने घरी सुखरूप पोहोचवले. असे असले तरी अनेक महिलांना या सुविधेची माहिती नसते. प्रवाशांची विशेषत: महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी कदंब महामंडळाच्या बसेस संध्याकाळी उशिरापर्यंत चालवाव्यात, असे लोकांचे मत आहे.

पिंक फोर्सची नि:स्पृह सेवा

याविषयी, कदंब महामंडळाचे व्यवस्थापक संजय घाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, कदंब महामंडळ रात्री १०.३० पर्यंत सेवा सुरू ठेवते. पणजी-मडगाव या व्यस्त मार्गावर उशिरा जाणाऱ्या कदंब बसमध्ये फक्त ३ ते ४ प्रवासी असतात. अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्याने बस उशिरा पोहोचते. अशा वेळी पिंक फोर्स महिलांना घरी पोहोचवते, ही चांगली सुविधा आहे.

कदंबची सेवामर्यादा वाढवावी

हल्लीच कदंब बस न आल्याने पेडणे येथील बसस्थानकात अडकून पडलेल्या एका वृद्ध महिलेला पिंक फोर्सने घरी सुखरूप पोहोचवले. असे असले तरी अनेक महिलांना या सुविधेची माहिती नसते. प्रवाशांची विशेषत: महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी कदंब महामंडळाच्या बसेस संध्याकाळी उशिरापर्यंत चालवाव्यात, असे लोकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT