Kadamba Digital Ticket  Dainik Gomantak
गोवा

Goa Kadamba: पणजीत 'कंडक्टरलेस' ई-बस सेवा सुरू; मिळतेय तिकीट बुकिंग, बस ट्रॅकिंग सुविधा

E-Kadamaba Goa: या ई-बसमध्ये तिकिटिंग आणि भाडे वसुलीसाठी प्रवेशद्वारावर पोल माउंट व्हॅलिडेटर बसवण्यात आले आहेत

Akshata Chhatre

पणजी: कदंब परिवहन महामंडळाने पणजी शहरात स्मार्ट सिटी ई-बस सेवेच्या तीन मार्गांवर कंडक्टरलेस बस सेवा सुरू करून प्रवाशांना तंत्रज्ञानावर आधारित प्रवासाचा नवा अनुभव द्यायला सुरुवात केली आहे. अल्तिन्हो (हिरवा), ताळगाव (नारंगी) आणि कुजिरा (इंडिगो) या मार्गांवर ही सेवा सुरू झाली आहे. या ई-बसमध्ये तिकिटिंग आणि भाडे वसुलीसाठी प्रवेशद्वारावर पोल माउंट व्हॅलिडेटर बसवण्यात आले आहेत.

"पणजीतील नागरिक आणि पर्यटकांनी या नवीन कंडक्टरलेस प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद द्यायला सुरुवात केलीये असं कदंबच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. या प्रणालीमध्ये, बस चालक पोल माउंट व्हॅलिडेटरद्वारे पेमेंट स्वीकारतात आणि प्रवाशांना तिकीट देतात.

या मशीनमध्ये टॅपिंग प्रणाली आहे, ज्याचा वापर करून प्रवासी बसमध्ये येऊ आणि बाहेर पडू शकतात. सुरुवातीला स्मार्ट सिटी ट्रान्झिट कार्डाचा वापर पेमेंटसाठी करण्यात आला होता, पण आता केटीसीने बँकिंग कार्ड, यूपीआय आणि रोख पेमेंटलाही परवानगी दिली आहे.

"पूर्णपणे डिजिटल पेमेंटमुळे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे, प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही स्मार्ट सिटी बस मार्गांवर रोख पेमेंट पुन्हा सुरू केले आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले. अलीकडेच, पणजी बाजार ते डोना पावला (लाल) मार्गावर हाल्फ कंडक्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर सहा थांबे आहेत, त्यापैकी तीन थांबे कंडक्टर विरहित आहेत आणि तीन थांब्यांवर कंडक्टर उपलब्ध आहेत. "आम्ही या सेवेचा आढावा घेऊ आणि लाल मार्ग पूर्णपणे कंडक्टरलेस करण्यासाठी प्रयत्न करू, ज्यामुळे तो पोल माउंट व्हॅलिडेटर वापरणारा चौथा मार्ग बनेल," असे अधिकाऱ्याने सांगितले.

स्मार्ट सिटी बस थांबे तिकीट प्री-बुकिंग सेवा, बस ओळख, बस ट्रॅकिंग आणि मार्ग नकाशा व्हिज्युअलायझेशनने सुसज्ज करण्याची योजनाही आखली जात आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास अनुभव मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम होईल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ आणि प्रभावी बनवण्याचा केटीसीचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT