Goa Kadamba Issue: 'कदंबाच वेळेत येणार नसेल तर पासचा काय फायदा'? प्रवास वेळखाऊ; वेळापत्रक बदलल्याने प्रवासी त्रस्त

Goa Kadamba Time Table: गेल्या १५ दिवसांपासून घोडगेवाडी ते पणजी सुरू असलेल्या कदंबाचे वेळापत्रक अचानक बदलल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
Kadamba bus service
Kadamba bus serviceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या १५ दिवसांपासून घोडगेवाडी ते पणजी सुरू असलेल्या कदंबाचे वेळापत्रक अचानक बदलल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि या त्रासाला कंटाळून सोमवारी (दि. १० फेब्रुवारी) गोडगेवाडीतील प्रवाशांनी पर्वरी डेपो मध्ये धडक दिली आणि त्यांच्या समस्या मांडल्या.

गोडगेवाडीतील प्रवाशांनी गोमंतकला दिलेल्या माहितीनुसार अचानक वेळापत्रक बदलल्यामुळे कामावर पोहोचायला उशीर होतो आणि अर्धा दिवस कापला जातो. गेली कित्येक वर्षे सुरळीत असलेलं कदंबा बसचं अचानक वेळापत्रक बदलल्यामुळे आमची गैरसोय होत असल्याचे प्रवीण केरकर नावाच्या एका प्रवाशाने सांगितले. आम्ही काढलेले कदंबाचे मासिक पास, स्मार्ट कार्ड यांचा काय फायदा जर बस वेळेत येत नसेल तर? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

कदंबाचे वेळापत्रक बदलल्याने त्यांनी अनेकवेळा डेपोमध्ये फोन करून चौकशी केल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र म्हणावं तसं उत्तर मिळालं नाही. भेडशी सारख्या गावांमध्ये जाणं कदंबावासीयांसाठी मुश्किल झालं आहे, दुसऱ्या कादंबाचा पर्याय उपलब्ध असला तरीही या बसने घरी पोहोचणं फार कठीण आहे, रात्री ८:३० पर्यंत प्रवास करत राहणं आम्हाला शक्य नाही असं महिला प्रवासी म्हणाल्या आहेत.

Kadamba bus service
Kadamba Bus: साखळी ते पणजी धावणारी 'कदंब' गायब? कारापूर-सर्वणमधील विद्यार्थी अडकले, बेभरवशाच्या सेवेमुळे अनेकांना फटका

कदंबाच्या डेपोमध्ये धडक दिल्यानंतर त्यांना वेळापत्रकात बदल केल्याची माहिती मिळाली, मात्र हा अचानक बदल का केला गेलाय असा प्रश्न प्रवाशांना सतावतोय. वेळेत जर का हे प्रवासी प्रवास करू शकणार नसतील तर या कदंबाचा काय फायदा? असं प्रवासी म्हणतायत.

गोडगेवाडीहून ६:४५ ची कदंबा सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. दोडामार्गाहून प्रवास करणाऱ्या या प्रवाशांसाठी बदललं वेळापत्रक किंवा अनियमित कदंबाची सेवा हा चिंतेचा विषय बनलाय आणि म्हणून ८:१५ वाजेपर्यंत करासवाडा, म्हापसा येथे कामासाठी वेळेत पोहोचणं त्यांच्यासाठी कठीण झालंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com