Kadamba Transport E-Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba EV Bus: राजधानीत प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' मार्गावर धावणार कदंबच्या दोन इलेक्ट्रिक बसगाड्या

Kadamba EV Bus: तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजीत आणखी काही इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार आहेत.

Ganeshprasad Gogate

Kadamba EV Bus कदंब परिवहन महामंडळाच्या ताफ्यात मंगळवारी दोन इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या बसगाड्या मिळाल्या असून या दोन्ही बसगाड्या पणजी बसस्थानक ते गोवा विद्यापीठ मार्गे बांबोळी रुग्णालय अशी सेवा देणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.

तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजीत आणखी काही इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त 32 इलेक्ट्रिक बसगाड्या मिळाल्या आहेत.या बसगाड्यांची वेळ आणि मार्ग लवकरच ठरवले जातील.

चार्जिंग स्टेशनचे कामही लवकरच सुरू होणार आहे. मडगाव, पर्वरी आणि इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. तसेच कदंब महामंडळाला सध्या 200 इलेक्ट्रिक बसगाड्यांचा तुटवडा भासत असल्याची माहितीही मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT