Mhadai River: नगरगाव पंचायत क्षेत्रातील सर्व रखडलेल्या विकास कामांना प्राधान्य देऊन लवकरात लवकर पूर्ण केली जाणार असुन मंत्री विश्वजित राणे यांच्या सहकार्यामुळे टप्याटप्याने नवीन कामांना चालना मिळत आहे. उस्ते येथील म्हादई नदीच्या काठावर संरक्षण भिंत बांधणे गरजेचे होते.
गेल्या कित्येक वर्षापासुन येथे संरक्षण भिंत बांधावी याची मागणी जोर धरुन होती. स्थानिक आमदारांमुळे आज या कामांना चालना मिळाली आहे.
अश्या कामांसाठी गावातील सर्वांचे सहकार्य गरजेचे असते तरच विकास कामे झपाट्याने पुर्ण होतात असे प्रतिपादन नगरगाव सरपंच संध्या खाडिलकर यांनी उस्ते सत्तरी येथे म्हादई नदीच्या काठावर बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीच्या पायाभरणी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना केले.
यावेळी स्थानिक पंच तथा उपसरपंच रामू खरवत जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे, कनिष्ठ अभियंता शहा, कंट्रातदार, देवस्थानचे गावकरी बारकेलो उस्तेकर, कृष्णा उस्तेकर, विठोबा उस्तेकर, विष्णू उस्तेकर, अंकुश उस्तेकर, काशिनाथ उस्तेकर, हरिश्चंद्र उस्तेकर, ज्ञानेश्वर उस्तेकर, प्रदीप उस्तेकर, देवगो उस्तेकर, काशिनाथ गावकर, रमेश गावकर व इतरांची उपस्थिती होती.
अभियंता शैलेश पोकळे यांनी सविस्तर माहिती दिली. एकूण 55 मिटरवर ही संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून जलसिंचन खात्यातर्फे हे काम करण्यात येणार आहे. एकुण 22 लाखांचा आसपास कामाची निविदा काढण्यात आली आहे. हे काम लवकरच सुरु करुन पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यात येणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुरुवात सातेरी देवीला नमन करुन व पा़डव्याच्या शुभमुहुर्तावर आज मंगळवारी संरक्षण भिंतीच्या कामाची विधीवत पायाभरणी करुन कामाचा शुभारंभ करण्यात आला. गावकरी बारकेलो उस्तेकर यांनी देवाला सांगणे केले.
यावेळी गावातील नागरिकांनी सरंक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत मंत्री विश्वजित राणे यांचे आभार मानले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.