Goa is ahead of Delhi in field of education

 

Dainik Gomantak

गोवा

शैक्षणिक क्षेत्रात गोवा दिल्लीपेक्षा सरसच

गेल्या दहा वर्षांत भाजप (BJP) सरकारने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतले

दैनिक गोमन्तक

सासष्टी: दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (AAP) निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvidnd Kejriwal) यांनी गोमंतकीयांची दिशाभूल करू नये. गेल्या दहा वर्षांत भाजप (BJP) सरकारने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जे महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतले, त्‍यामुळे शैक्षणिक क्षेत्रात गोवा केरळ पाठोपाठ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे शिरोड्याचे आमदार व राष्ट्रीय शिक्षण धोरण (Goa Education Policy) समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर (Subhash Shirodakar) यांनी सांगितले.

दिल्लीत (Delhi) तीन किंवा पाच स्टार पद्धतीच्या शाळा, महाविद्यालये सुरु केल्याचे केजरीवाल सांगतात. पण त्याचबरोबर तेथे 15 ते 20 टक्के मुले अशी आहेत, ज्यांनी शाळेच्या पायऱ्याच चढलेल्या नाहीत. सुमारे 20 टक्के विद्यार्थी शाळा अर्धवट सोडतात. प्रदूषणामुळे तेथील नागरिक हैराण झालेले आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानी भयंकर होत आहे. ही वस्तुस्थिती केजरीवाल का लपवतात, असा सवाल शिरोडकर यांनी उपस्‍थित केला.

वर्षाकाठी शिक्षणावर 400 कोटींचा खर्च

गोवा सरकारने कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षण अर्धवट सोडून जाण्याची वाटच ठेवलेली नाही. सरकार वर्षाकाठी शिक्षणावर 350 ते 400 कोटी रुपये खर्च करीत आहे. येथील पंधरा हजार युवक-युवती युरोप, अमेरिका, अरब देशांमधील नामांकित कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आरोग्यकार्ड योजना सुरू केली असून त्यानुसार त्यांच्या आहाराकडे सरकार लक्ष पुरवत आहे, असेही शिरोडकर म्‍हणाले. पुढील वर्षापासून नव्‍या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच गोवा फॉरवर्ड-काँग्रेसमध्ये झालेल्‍या युतीचा परिणाम आपल्या शिरोडा मतदारसंघात होणार नाही, असे शिरोडकर म्‍हणाले.

मोदींच्या कार्यक्रमाला 15 हजारांची उपस्थिती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गोवा मुक्तीच्या (Goa Liberation Day) हीरकमहोत्‍सवी वर्ष समारोह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गोव्यात येत आहेत. त्यांचे अऩेक कार्यक्रम राज्‍यात होणार आहेत. मुख्य कार्यक्रम ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर होईल. या कार्यक्रमाला सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असेल, असे शिरोडकर यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT