गोव्यातील आजचे महत्वाचे कार्यक्रम

गोवा मुक्तीच्या साठ वर्षांचे औचित्य साधून अखिल भारतीय कोकणी साहित्य संघ आणि रवींद्र भवन, मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोंय मुक्तीची साठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
Todays important events in Goa

Todays important events in Goa

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: गोवा मुक्तीच्या हीरक (Goa liberation Day) महोत्सवानिमित्त कुजिरा बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार शाळेत सकाळी ध्वजारोहण व सायं. 7वा. सांताक्रुझ कालापूर येथील श्री शांतादुर्गा मंदिराकडून मशाल मिरवणूक.

पणजी: गोवा मुक्तीच्या साठ वर्षांचे औचित्य साधून अखिल भारतीय कोकणी साहित्य संघ आणि रवींद्र भवन, मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोंय मुक्तीची साठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन. दु. 3.30 वाजता मडगाव येथील रवींद्र भवनच्या कृष्ण कक्षामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक तथा गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांचा सत्कार.

<div class="paragraphs"><p>Todays important events in Goa</p></div>
Revolutionary Goa - गोवा सु-राज पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर..

मडगाव: अखिल भारतीय साहित्य कोकणी संघातर्फे सायंकाळी 3.30 वाजता रवींद्र भवन, मडगाव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन. साहित्यिक नागेश करमली यांचा सत्कार करण्यात येणार असून त्यानंतर ‘मुक्त सांज’ ही काव्य मैफल होणार आहे.

शिवोली: युनायटेड युथ ऑफ शिवोलीतर्फे गोवा मुक्तिदिनाच्या पार्श्वभूमीवर फिशिंग स्पर्धेचे आयोजन. शिवोली मतदारसंघ मर्यादित मासळी पकडण्याची स्पर्धा दुपारी 3 वाजल्यापासूनच शिवोली-चोपडे पुलाच्या पायथ्याशी शापोरा नदीच्या पात्रात होणार आहे.

बोरी: ढवळीमळ येथील श्री गडेश्‍वराचा 13 वा वर्धापनदिन समारंभात विविध कार्यक्रम. यानिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीस अभिषेक, पूजा, व अन्य धार्मिक विधी. नंतर श्री सत्यनारायण महापूजा, पुराणवाचन, महाआरती, गाऱ्हाणे, प्रसाद व दुपारी सर्व भाविकांना महाप्रसाद.

<div class="paragraphs"><p>Todays important events in Goa</p></div>
Goa Liberation Day: मुख्यमंत्री सेवा पदकांचे वितरण

गोवा वेल्हा: शिरदोन पाळे येथील ग्रामदेवता श्री सातेरी मूळ संस्थानचा 17 व्या वर्धापनदिनानिमित्त नवग्रह होम, नवचंडी पारायण, कुंकुमार्चन, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. सायं. 8 वा. सुवासिनींकडून दिवजांचा सोहळा.

हरमल: गोवा मुक्ती हीरक महोत्सव समितीतर्फे श्री देवी भूमिका मंदिर, शेटकरवाडा येथे ‘गोवा मुक्तिलढ्याचा इतिहास’ विषयावर शिवाजी देसाई यांचे व्याख्यान सायं. 4वा.

पेडणे: आश्‍वे-मांद्रे श्री देवी भूमिका पंचायतन देवस्थानच्या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, रात्री मामा मोचेमाडकर नाट्यमंडळातर्फे दशावतारी नाट्यप्रयोग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com