Goa IPHB Dainik Gomantak
गोवा

Goa IPHB: डिसेंबरअखेर बांबोळीत होणार 500 खाटांचे मानसोपचार रूग्णालय

105 कोटी रूपये खर्च

Akshay Nirmale

Goa IPHB: गोव्याची राजधानी पणजीमध्ये बांबोळी येथील इंस्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्युमन बिहेव्हियर (IPHB) येथे मानसोपचार रूग्णालय सुरू होणार आहे. 500 खाटांचे हे नवीन मानसोपचार रूग्णालय पूर्ण होण्यास डिसेंबर अखेरपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, या रूग्णालयासाठी 105 कोटी रुपये खर्च आलेला आहे.

96,000 चौरस मीटर परिसरात हे रूग्णालय असणार आहे. हे नवीन रूग्णालय गोव्यातील वाढत्या मानसिक आरोग्याच्या प्रकरणांवर लक्ष देईल. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, गोव्यात दररोज सुमारे 40 ते 50 नैराश्यग्रस्त रूग्ण येत असतात.

चिंतेत असणारे रूग्ण, आत्महत्येचे विचार मनात येणारे अशा अनेकांचा यात समावेश आहे. याशिवाय इतर मानसिक आजार असलेले रूग्णही येथे उपचारासाठी येतात.

बांबोळीमध्ये नवीन मनोरुग्णालय बांधण्याचे कंत्राट क्यूबिक इन्फ्राला मिळाले आहे. येथे एक संशोधन आणि विकास केंद्र आणि एक स्वयंपाक घरदेखील बांधेल. कंपनीला गेल्या वर्षी जूनमध्ये निविदा मंजूर झाली होती.

तसेच ती पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाला गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: "आम्ही मतांचे राजकारण करत नाही,गोव्याच्या भल्यासाठी काम करतोय!" EHN वादावर मुख्यमंत्र्यांचे सरदेसाईंना 'सडेतोड' उत्तर

Kala Academy: कोट्यवधी खर्च केल्यानंतर 'कला अकादमी'ची अवस्था सुधारण्याऐवजी बिघडली कशी काय?

Goa Assembly Live: EHN योजनेमुळे 'अज्ञात' घरांना ओळख

Loliem: लोलयेवासीय गावाची 'अधोगती' पाहत राहतील की 'विरोध' करण्यास सज्ज होतील?

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

SCROLL FOR NEXT