National Games 2023: गोव्यात रूम टंचाई भासणार? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्यातील 100 हॉटेल्स बूक

स्पर्धेसाठी 17 हजार लोक गोव्यात येणार; पर्यटन हंगामालाही सुरवात
National Games 2023 Goa | Hotel Rooms Scarcity
National Games 2023 Goa | Hotel Rooms Scarcity Dainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games 2023 Goa: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 17000 लोक गोव्यात येणार आहेत. यात सुमारे 12000 खेळाडूंचांच समावेश आहे.

याशिवाय प्रशिक्षक, टेक्निकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य आणि व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.

त्यासाठी राज्यातील 100 हून अधिक हॉटेल्स स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे बूक करण्यात आली आहेत. त्यामुळे गोव्यात रूम्सची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एकीकडे नॅशनल स्पर्धा सुरू झालेली असताना गोव्यात पर्यटन हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांचा ओघ देखील गोव्याकडे सुरू आहे. रशियातून पहिले चार्टर विमान एक ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखलही झाले आहे.

National Games 2023 Goa | Hotel Rooms Scarcity
37th National Games साठी गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात 'स्पेशल इमर्जन्सी रूम'

या सर्व कारणांमुळे गोव्यात राहण्यासाठी हॉटेल्समध्ये रूम्सची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या गोव्यात टु स्टार आणि थ्री स्टार हॉटेल्समध्ये रूम्ससाठी मागणी वाढली आहे.

स्पर्धेच्या ठिकाणाजवळ निवासव्यवस्था

दरम्यान, शिष्टाचार सचि संजित रॉड्रिगेज यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील स्पर्धेच्या ठिकाणांनुसार निवासव्यवस्था करण्यात आली आहे. एकाच ठिकाणच्या हॉटेल्सवर ताण पडू नये यासाठी गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची विभागणी 6 क्लस्टर्समध्ये करण्यात आली आहे.

यात जिथे जी स्पर्धा असेल तिथेच त्या स्पर्धेशी संबंधित खेळाडू, टेक्निकल स्टाफ, प्रशिक्षक आदींची निवासव्यवस्था केली गेली आहे.

दिवाळीचा सण तोंडावर

तसेच ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. आणि त्यानंतर लगेचच दिवाळी सणाला सुरूवात होते. सणकाळातही सुट्ट्यांमुळे गोव्याकडे येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते.

National Games 2023 Goa | Hotel Rooms Scarcity
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

अरायव्हयल-डिपार्चर पॉईंट

दरम्यान, राज्य सरकारच्यावतीने प्रत्येक विमानतळ, रेल्वेस्टेशन, बस स्टँडवर अरायव्हल आणि डिपार्चर पॉईंट उभारले आहेत. यात सर्वाधिक बिझी दिवस 26 ऑक्टोबर असणार आहे.

त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे. याशिवाय 3 ते 5 नोव्हेंबर हा काळही स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. या काळात गोव्यात रूम्सची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com