Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता

गोवा हवामान वेधशाळेने ‘ऑरेंज अलर्ट’ चा इशारा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाच्या सरी कोसळत असून सोमवारीही मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याच्या गोवा (Goa) वेधशाळेने दिला आहे. (Goa Rain Update News)

गेल्या २४ तासांत ७४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७७२.६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना ६६६.२ मिमी पावसाची नोंद. यामुळे अद्यापही पावसाची (Rain) १४ टक्के तूट आहे.अद्यापही पावसाची १४ टक्के तूट आहे. वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी सांगितले की, २४ जूनला सरासरी ७४.१ मिमी, २५ जूनला ७२.९ मिमी तर आज २६ जून रोजी सरासरी ७४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

साखळी येथे सर्वाधिक १११.८ मिमी पाऊस

गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस साखळी येथे १११.८ मिमी तर वाळपई येथे १०६.४ मिमी, फोंडा येथे ९५ मिमी, पेडणे येथे ९२.८, म्हापसा येथे ७१, मुरगाव येथे ७०, सांगे येथे एकूण ७०.३ मिमी, तर काणकोणात ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीत (Panji) ४९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT