हिंदू ख्रिस्ती एकोप्याचे माणार कोपेलचे फेस्त उत्साहात

ख्रिस्ती कपेल समोर क्रॉस आणि तुळशी वृंदावन एकाच ठिकाणी
Manar Kopel's annual fest
Manar Kopel's annual festDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मोरजी विठ्ठलदास वाडा येथील माणार कोपेलचे वार्षिक फेस्त मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. हिंदू ख्रिस्ती या दोन्ही धर्मातील बांधव एकत्र येऊन संयुक्तरीत्या हे फेस्त साजरे करण्याचा उपक्रम राबवतात या फेस्ता साठी राज्यातील आणि राज्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. वेगवेगळ्या पॅरिसचे फादर या ठिकाणी उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या सूचना करून सामाजिक बांधिलकी कशी जपावी आपला धर्म माणुसकीचा धर्म कसा जपावा दुसऱ्यांसाठी कशा पद्धतीने कार्य करावे. याचेही वेगवेगळे मार्ग मार्गदर्शन या फेस्त च्या निमित्ताने फादर देत असतात. (Manar Kopel's annual fest at Morji celebrated with enthusiasm )

Manar Kopel's annual fest
मुख्यमंत्र्यांनी लोकशाही विरोधी धोरणांवर आत्मचिंतन करावे - युरी आलेमाव

ख्रिस्ती कपेल समोर क्रॉस आणि तुळशी वृंदावन एकाच ठिकाणी

मोरजी पंचायत क्षेत्रात हिंदूंच्या मंदिराबरोबरच ख्रिस्ती बांधवांच्या चर्च व कपिल या ठिकाणी आहेत या गावात हिंदू व ख्रिश्चन बांधव गुण्यागोविंदाने राहतात. नाताळ व चतुर्थीच्या सणात दोन्ही धर्मातील लोकांचा सहभाग असतो. दरम्यान विठ्ठलदास वाडा येथील माणार येथे असलेले कपिल ख्रिस्ती बांधवांची प्रार्थनास्थळ असले तरी हिंदू बांधव मोठ्या भक्तिभावाने आपल्या अडीअडचणी नवस या कपिला देवाजवळ म्हणतात. या ठिकाणी अजूनही हिंदूंचा लामण दिवा नियमित पेटवला जातो. माणार कपेल आहे बाजूलाच क्रॉस व हिंदूंची तुळशीवृंदावन आहे.

Manar Kopel's annual fest
गोव्यात कोरोनाचे दोन बळी; नव्या 112 रुग्णांची भर

त्या ठिकाणी दोन्ही समाजातील लोक आपापले गाऱ्हाणे म्हणतात. त्याच प्रमाणे ख्रिस्ती बांधव तेस करतात त्याच धर्तीवर हिंदू लोकही त्या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असतात. याच माणार कपलचे वार्षिक फेस्त 26 रोजी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. याठिकाणी राज्यातील आणि राज्याबाहेरील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पावसाची तमा न बाळगता भाविकांनी सकाळपासून कपिल परिसरात प्रार्थना स्थळी उपस्थिती लावली. वेगवेगळ्या ठिकाणाहून ख्रिस्त फादर आले त्यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com