Uguem | Sanguem Dainik Gomantak
गोवा

Goa IIT: ग्रामस्थांचा पंचायत मंडळावर प्रश्नांचा भडिमार; ग्रामसभेमध्ये वातावरण तापले!

Uguem-Sanguem: पंचायत सभागृहाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त तैनात

दैनिक गोमन्तक

Sanguem: उगे-सांगे पंचायतीची पहिलीच ग्रामसभा बरीच गाजली. खास करून रस्त्यावरील दिवाबत्ती आणि आयआयटी विषयावर गरमागरम चर्चा झाली. यावेळी पंचायत सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

आयआयटीसंदर्भात ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला प्रश्न केला असता, याविषयी पंचायतीला काहीही माहिती दिलेली नाही वा प्रकल्प उभारणीसाठी ना हरकत दाखला कोणी मागितलेला नसल्याची माहिती दिली. या ग्रामसभेला पंच मंडळ आणि शंभरहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

आयआयटी प्रकल्पावरून तापलेल्या वातावरणात ग्रामस्थांनी पंचायत मंडळावर प्रश्नांचा भडिमार केला. सांतान रॉड्रिग्स यांनी आयआयटीसंदर्भात ग्रामसभेत चर्चा केल्याशिवाय कोणताही कागदोपत्री व्यवहार करू नये, अशी मागणी केली. ग्रामसभेत प्रवेश करणाऱ्यांची ओळखपत्रे तपासल्यामुळे ग्रामस्थ भडकले होते. पंचायत मंडळ आजपर्यंत काहीच माहिती देत नसल्याचे वातावरण अधिकच तापले होते.

ग्रामस्थ आपल्या प्रभागातील पंचांकडे आयआयटीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करीत होते. यावेळी पंच विठ्ठल गावकर, दिव्या नाईक, मार्कुस परेरा, राम पांढरमिसाळ, अल्वीरा फर्नांडिस, उत्कर्षा देसाई, पंचायत सचिव सुषमा सावंत देसाई उपस्थित होत्या.

अंधारातच राहायचे का?

उगे प्रभाग क्र. 2 मध्ये विजेची सोय का केली नाही, असा प्रश्न टीना कुतिन्हो यांनी विचारला असता तो प्रस्ताव केंद्र सरकारचा असल्याने वीज खाते त्याची पूर्तता करू शकत नसल्याचे उत्तर वीज मंत्र्यांनी दिले आहे. ‘आम्ही आयुष्यभर अंधारातच राहायचे का’ असा प्रश्न उपस्थित ग्रामस्थांनी केला.

जमिनीविषयी पंचायत मंडळ अनभिज्ञ

पंचायतीच्या अखत्यारीतील जमिनीवर आयआयटी प्रकल्प येतोय, हे जग जाणून असताना उगे पंचायत भागात 144 कलम लावून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. तरीही पंचायत मंडळ काहीच माहीत नसल्याचे सांगत असल्याने लोक भडकले आहेत. आयआयटीसंदर्भात पुढील ग्रामसभेत निर्णय घेऊ, असे सरपंच नाईक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT