मडगाव: सांगे येथे होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाला होणारा वाढता विरोध लक्षात घेता दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी आज दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
(Section 144 applicable in Sanguem IIT project area)
144 कलमाखाली जारी केलेल्या या आदेशात प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेपासून 200 मीटर अंतरात पाच व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्तींच्या संचारावर बंदी आणली असून या परिसरात सभा घेण्यास किंवा निदर्शने करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. कोटार्ली सांगे येथे हा प्रकल्प उभा होत असून काल या जागेचे सिमांकन करण्यासाठी अधिकारी आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना अडविले होते.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर लोकांनी त्यांनाही धक्काबुक्की केली होती. आज या प्रकरणी एका आंदोलकाला अटक केल्यावर सांगे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला होता. आता या परिसरात 144 कलम लागू करत प्रशासनाने तणावजनक स्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सांगे येथे होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी निदर्शने सुरु केली आहेत. दिनांक 12 सप्टेंबर रोजी आयआयटी प्रकल्पाच्या सिमांकनासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यापासून या प्रकरणाने वेग घेतला आहे.
दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे की, काहींना विरोध करण्याची आता सवय लागली आहे. त्यामूळे सरकार या प्रकल्पाबाबत ठाम आहे. तसेच या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन जाणार आहे. अशा नागरिकांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना भेटत आपली कागदपत्रे त्यांच्याकडे सोपवावी म्हणजे अशा नागरिकांचा सकारात्मक विचार करत राज्यशासन तातडीने निर्णय घेईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.