Goa News: सुदेश नार्वेकर हे बनले खरे देवदूत! शंभरवेळा रक्तदानाचा विक्रम

Goa News: सुदेश नार्वेकर यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून रक्तदानाला सुरुवात केली.
Blood Donation
Blood Donation Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: रक्तदान म्हणजे जीवनदान आहे. फोंडा येथील अनेकांना रक्तदान (Blood Donation) करून जीवनदान देणारे सुदेश रमाकांत नार्वेकर हे खरे देवदूत बनले आहेत. नार्वेकर हे फोंडा महालात जन्मले. त्यांना लहानपणापासून समाजासाठी धडपडण्याची सवय. सध्या कुठल्याही क्षणी, कुणालाही रक्ताची आवश्यकता भासते, त्यावेळी सुदेश कोणताही विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जातात आणि रक्तदान करतात. त्यांच्या या दातृत्वाने आजपर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत.

सुदेश नार्वेकर यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून रक्तदानाला सुरुवात केली. गेली 33 वर्षे ते नियमित रक्तदान करत आहेत. 33 वर्षे झाली ते नियमित रक्तदान करत आहेत. सध्या त्यांचे वय 51 वर्षे आहे. त्यांनी आतापर्यंत 100 वेळा रक्तदान करत एकप्रकारचा विक्रमच केला आहे.

Blood Donation
Goa Pertol Diesel Price| जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

नार्वेकर म्हणाले की, मला लहानपणापासूनच रक्तदान करायचे होते. पण वय कमी असल्याने रक्तदान करू दिले जात नव्हते. जेव्हा मला 18 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा रक्तदानाला सुरुवात केली. ते कार्य आजपर्यंत सुरू आहे. पूर्वी वर्षातून एकदा रक्तदान करायचो; पण गेल्या पाच वर्षांपासून वर्षातून किमान चारवेळा रक्तदान करतो.

काही वर्षांपूर्वी नार्वेकर यांनी गावातील होतकरूंना हाताशी घेऊन मातृभूमी सेवा ही संघटना स्थापन केली होती. संघटनेमार्फत काही रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. पण काही कारणास्तव ही संघटना बंद पडली. काही वर्षांनंतर कोरोना महामारी सुरू झाली, तेव्हा रक्ताची कमतरता भासत होती. तेव्हा नार्वेकर यांनी सार्थक फाऊंडेशन ऑफ गोवा संघटना स्थापन केली. या संघटनेने कमी वेळेत उंच भरारी घेतली. नार्वेकर या संस्थेचे गोवा संयोजक आहेत.

Blood Donation
Goa News: सरकारने मुरगाव बंदरात कोळशाऐवजी; क्रूझ टर्मिनल उभारावे

मुलगा चालवणार बाबांचा वारसा: सार्थक संघटनेचे गोव्यात 30 पदाधिकारी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संघटनेतर्फे आरोग्य शिबिरेही भरविली जात आहेत. सुदेश नार्वेकर म्हणाले, की हा वारसा माझा मुलगा चालवणार आहे. त्यांचे स्वप्न आहे की, त्यांच्या मुलांनी खूप शिकून समाजकार्य करावे. त्यांच्या मुलाला गेल्याच महिन्यात 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तो लवकरच हे कार्य सुरू करेल.

सुदेश नार्वेकर, समाज कार्यकर्ते-

सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. सर्वांसाठी योग्य आहार गरजेचा आहे. काहींचा रक्तदानाबद्दल गैरसमज असतो. तो गैरसमज दूर करून नियमित रक्तदान केले पाहिजे. शरीरात जोपर्यंत रक्त आहे, तोपर्यंत मी रक्तदान करत राहीन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com