Goa hoteliers benefit from Prashant Kishor's I Pack organization Dainik Gomantak
गोवा

आय पॅकवाल्यांचा गोवा हॉटेल चालकांना दिलासा

लोकांच्या संपर्कात येऊन हे आय पॅकवाले गोव्याची परिस्थिती समजून घेतात

दैनिक गोमन्तक

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या ‘आय पॅक’ (I pack) या संघटनेचे शेकडो लोक गोव्यात आले आहेत, परंतु ते जीवाचा गोवा (Goa) करायला मात्र आलेले नाहीत. तरीही पर्यटन (Tourism) हंगाम सुरू झाल्या झाल्या त्यांनी हॉटेलचालकांना (Hotel) मोठा दिलासा दिला.

केवळ पणजीतच नाही, तर प्रमुख शहरातील सर्व हॉटेल या आय पॅकवाल्यांनी सध्या व्यापली आहेत. जो तो सध्या आय पॅकचीच गोष्ट सांगतो. प्रमुख साहित्यिकांसह बुद्धिजीवी, वकील, पत्रकार आणि राजकीय निरीक्षक यांना त्यांनी बिझी करून टाकले आहे. त्यांना ही यादी कोणी दिली माहीत नाही, परंतु राजकारणाशी दूरूनसुद्धा संबंध नसलेल्या लोकांच्या संपर्कात येऊन हे आय पॅकवाले गोव्याची परिस्थिती समजून घेतात.

अशीच काहीशी यंत्रणा गेल्या तीन वर्षांत आम आदमी पक्षाने उभी केली आहे, परंतु आय पॅकवाले त्यांच्याही वरताण काम करतात. दुर्दैवाने काँग्रेसवाले आपल्याच विश्वात मश्गूल आहेत आणि गिरीशरावांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडतात. काँग्रेसला - त्यांच्या नेत्यांकडे तुंबून पैसा असतानाही अद्याप एकही सर्वेक्षण करण्याचे सुचलेले नाही, हे काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे दुर्दैव नाही काय?

तृणमूल काँग्रेस त्याचप्रमाणे प्रशांत किशोर यांच्या ‘आय पॅक’च्या वतीने गोव्यात जोरदार राजकीय हालचाली चालू झाल्या आहेत. ‘आय पॅक’चे कर्मचारी जरी तृणमूल काँग्रेससाठी काम करीत नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्यात बऱ्याच प्रमाणात समन्वय आहे. विशेषतः प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसबाबत चाचपणी करीत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यांनी गेल्या आठवड्यात एक दिवसाच्या भेटीत अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली.

त्यांनी काही नेत्यांना महत्त्वपूर्ण पदे देण्याचेही बोलून दाखविले आहे. सूत्रांनी सांगितलेल्या महितीनुसार, डेरेक ओब्रायन यांनी उत्तर गोव्यात, तर प्रसून जोशी यांनी दक्षिण गोव्यात महत्त्वपूर्ण लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT