Goa: गावागावातील कचरा गोळा करण्यासाठी (Garbage collection) सरकार प्रत्येक पंचायतीला खास निधी देत असते. काही पंचायती व्यवस्थित विनियोग करते. गावातील रस्त्यावर कचरा किंवा घराघरातील कचरा त्या त्या पंचायती उचलत असतात मात्र किनारी भागातील कचरा कोण उचलणार अशी स्थिती असतानाच मोरजी किनारी (Morjim Beach) भागातील कचरा प्लास्टिक गोळा करण्यासाठी विदेशी (Russian Tourist) पर्यटकांनी पुढाकार घेतला आहे.
मोरजी टेंबवाडा किनारी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. प्रत्येक किनारी भागातील कचरा उचलण्याचे कंत्राट 'दृष्टी' या संस्थेला दिले आहे. त्यामार्फत मोरजीतील किनारी भागातील कचरा उचलण्यासाठी दोन कामगारांची नियुक्ती केली होती. परंतु त्याना वेळेवर पगार दिला गेला नसल्याने ते कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे सर्वत्र कचरा दिसून येतो. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले विदेशी पर्यटक या किनारी भागात कचरा पाहून कसे स्वस्त बसणार, स्वच्छ सुंदर किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी रशियन पर्यटकांनी मागच्या दोन दिवसापासून काचारा उचलण्यासाठी मोहीम उभारलेली आहे.
रशियन नागरिकांनी माहिती देताना आम्ही दरवर्षी या सुंदर किनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतो. यंदा मोठ्या प्रमाणात किनारी भागात कचरा साचलेला आहे. शिवाय रस्त्याच्या बाजूला कचरा फेकण्याचा प्रकार वाढत असल्याचे सांगितले. गावातील प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून कचऱ्याची व्हीलेवाट लावावी, शिवाय जो कोणी कचरा उडवतो त्यासाठी सीसीटीव्ही लावण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रत्येकजण किनारी फिरायला येतो, त्यांनी केवळ १० मिनिटे या कामाला दिली तर किनारा अधिक स्वच्छ व्हायला विलंब लागणार नाही असे मत पर्यटकाने व्यक्त केले. सुरुवातीला आम्ही दोघांनी कचरा गोळा केला. आमचे कार्य पाहून इतरही पर्यटक सहभागी झाले असे सांगितले. स्थानिक युवक आल्बर्ट यांनी प्रतिक्रिया देताना पर्यटन खात्याचे आणि पर्यटक मंत्र्याचे या किनारी पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने हि स्थिती निर्माण झाली आहे. पर्यटक हे आमचे पाहुणे आहेत. त्याना कोणी कामाला लावले, ते पर्यटनाचा आनद लुटण्यासाठी येतात. सरकार मात्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी अपयशी ठरत आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त करून पर्यटकाना गार्बेज गोळा करावी लागते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.