Goa Beach Wedding Goa Tourism
गोवा

गोव्यात Beach Wedding महागलं? दिवसाला मोजावे लागणारे तब्बल 'एवढे' रुपये, Price Details

Goa Beach Wedding Rate: नवीन दर केवळ लग्नसोहळ्याच नव्हे तर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर आयोजित सर्व खाजगी कार्यक्रमांना लागू असतील.

Pramod Yadav

Goa Beach Wedding

पणजी: गोव्यात समुद्रकिनारी नयनरम्य निसर्गाच्या साक्षीने लग्नगाठ बांधण्याची अनेकांची इच्छा असते. पावसाळा संपताच गोव्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर लग्नासाठी गोवा पर्यटन खात्याकडे अर्ज दाखल व्हायला सुरुवात होतात. पण, आता गोव्यात Beach Wedding महागलं असून, विवाह इच्छुकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

Goa Beach Wedding

गोव्यात समुद्रकिनारी विवाहसोहळ्यांसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. असे असताना गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) ने Beach Wedding च्या शुल्कात वाढ केली आहे. GCZMA च्या वतीने प्रतिदिन 1 लाख रुपये शुल्क आकारण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन दर केवळ लग्नसोहळ्याच नव्हे तर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर आयोजित सर्व खाजगी कार्यक्रमांना लागू असतील.

Beach Wedding

दरम्यान, सरकारी आणि स्वायत्त संस्था, धर्मादाय ट्रस्ट, शाळा आणि क्रीडा इव्हेंटसाठी शुल्कात 75% सवलत देण्यात आली आहे.

डिसेंबर आणि जानेवारीमध्ये, बीच पार्टी आणि विवाहसोहळ्यांसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जांची संख्या GCZMA किनारी नियमन क्षेत्राच्या उल्लंघनाच्या प्रकरणांपेक्षा जास्त आहे.

नवीन दरात बांधकाम परवानग्यांचा देखील समावेश आहे. GCZMA किनारपट्टी भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी देण्यासाठी 1 लाख रुपये आकारेल. GCZMA ने प्रथमच होर्डिंग्जच्या परवानगी शुल्काचा देखील यात समावेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT