रेल्वेतून प्रवाशांच्या अपघाताच्या घटना वारंवार समोर येत असतात. कोकण रेल्वेतून प्रवास करणारी एक विद्यार्थिनी धावत्या ट्रेनमधून खाली कोसळली पण, यावेळी स्थानकावर असणाऱ्या महिला आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे तिला वाचविण्यात यश आले.
कोकण रेल्वेच्या वतीने हा घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध करुन रेल्वे प्रवाशांना महत्वाचे आवाहन केले आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळुरु सेंट्रल - मडगाव जंक्शन (Train no. 06602 Mangaluru Central - Madgaon Jn) स्पेशल ट्रेनमध्ये हा अपघात झाला. उडपी रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जात असताना एक महिला प्रवासी दारातून खाली कोसळल्या, लगतच्या असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थिनी कोसळली. पण, ट्रेन वेगात असल्याने विद्यार्थिनीला स्वत:ला सावरता आले नाही.
याचवेळी स्थानकावर असणारी महिला आरपीएफ जवान विद्यार्थिनीच्या मदतीसाठी धावली आणि आणखी एका तरुणाच्या मदतीने तिला सुखरुप बाहेर काढण्यात आले. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे विद्यार्थिनी थोडक्यात बचावली.
ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना बऱ्याचवेळा अनेक प्रवासी घाई करतात. तसेच, आवश्यक काळजी घेत नाहीत. त्यामुळे अपघात घडतात. अनेकवेळा पाय घसरुन अथवा ट्रेनच्या वेगाचा अंदाज न आल्याने प्रवासी प्लॅटफॉर्मवरती कोसळतात. दरम्यान, कोकण रेल्वेने प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ट्रेनमधून चढउतार करताना खबरदारी घ्यावी अशी सूचना केलीय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.