Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी आमदार मायकल लोबोंना न्यायालयाची नोटीस; बाऊन्सर तैनात केल्याचा आरोप

Michael Lobo Illegal Construction: सामाजिक कार्यकर्ते डेस्‍मंड आल्वारीस यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हणजूण-वागातोर किनारपट्टीवरील ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये कथित बेकायदेशीर बांधकामे केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आमदार मायकल लोबो यांना नोटीस बजावली आहे. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तपासणी पथकाला रोखण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर बाऊन्सर तैनात केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते डेस्‍मंड आल्वारीस यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सर्व्हे क्रमांक ३५४/१, ३४०/० आणि ३४०/१ मध्ये तात्पुरत्या लाकडी कॉटेजच्या नावाखाली पक्की बांधकामे केल्याचा दावा याचिकेत करण्‍यात आला आहे. ही बांधकामे सीआरझेड-३ क्षेत्रातील भरतीरेषेपासून अवघ्या ४४ मीटर अंतरावर असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने प्रतिवादींना चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे, तर याचिकाकर्त्याला त्यानंतर दोन आठवड्यांत प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

वाळूउपसा, बोअरवेलवरूनही आरोप

सहा ते सात फूट उंच वाळूचे ढिगारे आणि किनाऱ्यावरील वनस्पती जड यंत्रसामग्रीने हटवल्याचा, सुमारे ४० ट्रक वाळू उपसल्याचा तसेच अनधिकृत बोअरवेल खणल्याचा दावा याचिकेत करण्‍यात आला आहे. नगरनियोजन विभागाची तांत्रिक मंजुरी आणि जिल्हाधिकाऱ्यांची रुपांतरण सनद नसल्याचेही नमूद केले आहे. ग्रामपंचायतीने आवश्यक पडताळणीशिवाय ३० जानेवारी २०२५ रोजी बांधकाम परवाना दिल्याचा आरोप करण्‍यात आला आहे.

‘जीसीझेडएमए’च्या पाहणीत अडथळा

१२ जून २०२५ रोजी जीसीझेडएमएच्या अधिकाऱ्यांनी नियोजित केलेल्या पाहणीवेळी मुख्य प्रवेशद्वारावर बाऊन्सर तैनात करून तपासणी पथकाला आत जाण्यापासून रोखल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने लोबो यांच्याकडून उत्तर मागितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रोहित शर्मा दुसऱ्यांदा लग्न करणार? वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 'हिटमॅन' काहीही करायला तयार

Goa Politics: 'काँग्रेसमध्ये उमेदवारी विकण्याची जुनी खोड'; चर्चिल आलेमाव यांचा गंभीर आरोप, विजयाबाबतही इशारा

America Strikes Qeshm Island: केशम बेटावरील स्फोटांनी हादरले इराण! मतदानाच्या दिवशीच अमेरिकेकडून लष्करी कारवाई; 'आत्मरक्षणासाठी' हल्ला केल्याचा दावा

Goa Protest: वेलिंगकरविरोधी आंदोलनप्रकरणी आठजणांचे बाँड सादर; म्हणाले, 'कितीही गुन्हे दाखल करा, मागे हटणार नाही'

Goa Politics: आरजीतील संघर्ष पेटला! मनोज परब गट निवडणूक लढवणार; 18 मतदारसंघांत गटसमित्यांची पुनर्रचना

SCROLL FOR NEXT