

मडगाव: निवडणुकीत पैसे घेऊन उमेदवारी विकण्याची काँग्रेसची जुनी खोड आहे. यावेळीही असे प्रकार घडल्यास गोव्यात काँग्रेसचा विजय कठीण होईल, असा आरोप बाणावलीतून उमेदवारीचा दावा करणारे चर्चिल आलेमाव यांनी केला.
पैसे कोण घेतो, हे सांगण्यास नकार देऊन पत्रकारांनीच शोध घ्यावा, असे चर्चिल म्हणाले. या निवडणुकीवेळीही असे प्रकार घडतील, याची आपल्याला २०० टक्के खात्री असल्याचा दावाही त्यांनी केला.
आपण यावेळी निवडणूक लढवणार असून काँग्रेस उमेदवारीला पहिली पसंती असेल. ती न मिळाल्यास लोकांच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले. वालंका आलेमाव नावेलीतून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नावेलीतून सिप्रू कार्दोझ आणि प्रतिमा कुतिन्हो यांनीही काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मी ‘सीएसआर’ जमा करणारा आमदार नव्हे
बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांचे नाव न घेता चर्चिल आलेमाव यांनी टीका केली. आपण आमदार असताना केलेला विकास आजही कायम असून, त्यात नवीन भर पडलेली नाही, असा दावा त्यांनी केला. आपण लोकांची कामे करणारे आमदार होतो; हॉटेलांमध्ये जाऊन सीएसआर निधी जमा करणारा आमदार नव्हतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.