Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: ढगफुटीला कारण वाढते तापमान!

Goa Rain: गोव्यात ऑक्टोबरमध्ये असा पाऊस पहिल्यांदाच कोसळला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Rain: सत्तरी तालुक्यात जो शुक्रवारी केवळ दोन ते तीन तासांत 111 मी.मी. पाऊस बरसला, अशा प्रकारची परिस्थिती राज्यात पहिल्यांदाच घडलेली नाही. गेल्या काही वर्षांती ऑक्टोबरमधील पावसाचा आढावा घेतला असता, असे जाणवते की अशा प्रकारे अनेकदा बरसात झालेली आहे. परंतु सत्तरी आणि पेडणे या दोन तालुक्यांमध्ये अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडण्याच्या घटना अधिक झाल्याचे दिसून येते.

गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम.राहुल म्हणाले, ‘सत्तरी आणि पेडणे तालुक्यांचा विचार करता या तालुक्यांना घाट जवळ आहे. जेव्हा-जेव्हा अशा प्रकारचा पाऊस बरसला त्यावेळीचे एक प्रमुख कारण म्हणजे तापमान वाढ, हे देखील आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पूर्वी देखील घडल्या आहेत.

सर्वाधिक नोंद

आतापर्यंतच्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर 1952 रोजी एका दिवसांत 354 मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. जी ऑक्टोबरमध्ये केवळ 24 तासांत सर्वाधिक पडलेल्या पावसाची नोंद आहे. याचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

ऑक्टोबरमधील एका दिवसातील पाऊस: 7-10-2021 (177) पणजी, 11-10-2020 (80) पेडणे, 26-10-2019 (220) पेडणे, 9-10-2018 (78) फोंडा, 10-10-2017 (112) पेडणे, 10-10-2016 (86) वाळपई मी.मी पाऊसाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT