Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: राज्यात पावसानं पुन्हा उडवली दाणादाण, पर्वरीत वाहनधारकांची त्रेधातिरपिट; चिखलामुळे वाहतूक कोंडी!

Heavy Rain Traffic jam Porvorim: राज्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. कमी-जास्त प्रमाणात पडलेल्या या पावसाने काही ठिकाणी वातावरण थंडही झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. कमी-जास्त प्रमाणात पडलेल्या या पावसाने काही ठिकाणी वातावरण थंडही झाले. परंतु पर्वरीत मात्र वाहनधारकांची पावसामुळे त्रेधातिरपिट उडाल्याचे दिसून आले.

उड्डाणपुलाच्या कामांमुळे खोदकाम झालेल्या ठिकाणी पाणी साचल्याने बाजूच्या मार्गावर वाहनधारकांना जाताना कसरत करावी लागत होती. त्यात दुचाकीधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने पाण्यातून हाकावी लागत होती. चारचाकी वाहनधारकांनाही मात्र पाण्याचा अंदाज घेऊनच वाहने पुढे न्यावी लागत होती.

मॉल दी गोवा व समोरील चोडणकर हॉस्पिटलच्या मध्यभागी उड्डाण पुलासाठी खोदकाम सुरू केले आहे, त्यामुळे याठिकाणी वाहनांची कोंडी झाली आणि त्याचा परिणाम पणजीतून म्हापशाकडे जाणाऱ्या वाहनांवर आणि म्हापशाकडून पणजीकडे येणाऱ्या वाहनांच्या मार्गावर झाला. या वाहतूक कोंडीमुळे चोगम रस्त्यापासून पणजीला पोहोचण्यासाठी दीड तासांचा अवधी लागल्याचे वाहनधारकांनी सांगितले.

पर्वरीतील वाहतूक समस्यांवर गोमन्तकने नुकताच प्रकाश टाकला होता. त्याशिवाय सरकारी खात्यातील समन्वयाच्या अभावामुळे पर्वरीत अनेक समस्या सुरू झाल्याचे मंत्री व येथील आमदारांनीही मान्य केले आहे.

कोंडी नित्याचीच; पोलिसांची कमतरता

उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यापूर्वी पर्यायी मार्गाची निर्मिती होणे अपेक्षित होते, ते काम झालेले नाही. जे मार्ग पर्यायी म्हणून निश्चित केले होते, त्या रस्त्याच्या खालून भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय पर्यायी मार्ग मिळत नाही. त्याचबरोबर पावसात झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आवश्यक असणारा वाहतूक पोलिसांचा ताफाही याठिकाणी दिसून आला नाही, काही ठिकाणीच पोलिस दिसत असल्याने या वाहतूक कोंडीशी त्यांचा काही संबंध नसल्याचाच प्रत्यय या खात्याने दाखविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Kartik Purnima: गोव्यात मंदिरांसमोरील दीपमाळची परंपरा कधी पासून?

Goa Land Policy: राज्यात भू-रुपांतर सुरुच! 32 भूखंडांच्या विभाग बदलास नगररविकास खात्याची मान्यता

Breaking: गुजरातमध्ये जहाजातून तब्बल ५०० किलो अमली पदार्थ जप्त, NCB- नौदलाची मोठी कारवाई

Goa Live Updates: सुखी, समाधानी, समृद्ध गोवेकर हेच आमचे ध्येय!

IFFI Film Premiere: इफ्‍फीत ‘हिसाब बराबर’ सिनेमाचा जागतिक प्रीमियर; इंडियन पॅनोरमामध्ये झळकणार ‘अमर आज मरेगा’ चित्रपट

SCROLL FOR NEXT