Goa Rain: ऐन दिवाळीत गोव्यावर पावसाचे सावट; IMD कडून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Latest Rain Updates: राज्यात सर्वत्र दिवाळीचा माहोल असताना पाऊस मात्र यात अडथळा बनू शकतो, IMDने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात तीन दिवसांसाठी यलो अलर्ट
Goa Latest Rain Updates: राज्यात सर्वत्र दिवाळीचा माहोल असताना पाऊस मात्र यात अडथळा बनू शकतो, IMDने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात तीन दिवसांसाठी यलो अलर्ट
Goa Latest Rain UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Rain Latest Updates

गोवा: राज्यात सर्वत्र दिवाळीचा माहोल असताना पाऊस मात्र यात अडथळा बनू शकतो. IMDने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात आज (दि. ३० ऑक्टोबर) ते १ नोव्हेंबर अशा तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार परतीच्या पावसाने पकडलेला हा जोर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. IMDच्या अंदाजानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 km/hr वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

काल राज्यात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण होते, तसेच अनेक भागांमध्ये पाऊस देखील झाला. उत्तर गोव्यातील पणजीमधील कमाल तापमान 31.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.5 अंश सेल्सिअसवर होते, तर दुसऱ्या बाजूला दक्षिण गोव्यातील मडगावमध्ये कमाल तापमान 32.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते.

यंदा नरकासुर होणार नाही का?

गोव्यात पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि यामुळे राज्यातील नरकासुराचं दहन होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. गोव्यातली दिवाळीचा सण नरकासुराशिवाय अपूर्ण असल्याने राज्यातील युवकांनी यावर एक वेगळाच उपाय शोधून काढला.

Goa Latest Rain Updates: राज्यात सर्वत्र दिवाळीचा माहोल असताना पाऊस मात्र यात अडथळा बनू शकतो, IMDने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात तीन दिवसांसाठी यलो अलर्ट
Narkasur In Goa: सततच्या पावसामुळे यंदा गोव्यातील नरकासुर 'वॉटर प्रूफ'

यंदा राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे नरकासुरांना वॉटर प्रूफ रंग देण्यात आलाय आणि म्हणूनच नरकासुर दहनावर पावसाचा काहीही परिणाम होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com