Goa Health Dainiak Gomantak
गोवा

Goa Health: 'एआय'च्या मदतीने फुफ्फुसाच्या कॅन्सरवर मात; राज्यातील 1.28 लाख नागरिकांची तपासणी पूर्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Goa Health Department AI Technology: फुफ्फुसाच्या कॅन्सरविरोधातील लढा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आरोग्य खात्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील १.२८ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी केल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी बुधवारी दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: फुफ्फुसाच्या कॅन्सरविरोधातील लढा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आरोग्य खात्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील १.२८ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी केल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी बुधवारी दिली. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) इस्पितळात फुफ्फुसाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उपचारोत्तर काळजी विभागाचे उद्‌घाटन केल्‍यानंतर राणे बोलत होते.

नवीन तंत्रज्ञानामुळे कॅन्सरचे लवकर निदान होऊन रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करणे शक्य झाले आहे. राज्यात फुफ्फुस कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘एआय’च्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राणे म्‍हणाले.

या उपक्रमाअंतर्गत राज्यातील १८ केंद्रांवर गेल्या काही महिन्यांत १.२८ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. ‘ॲस्ट्रा झेनेका’ आणि ‘क्युअर.एआय’ यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली असून, त्यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रारंभीच निदान करणे शक्य झाले, असे राणे यांनी सांगितले.

दरम्‍यान, टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक कॅन्सर इस्पितळ डिसेंबर २०२६ पूर्वी किंवा २०२७ च्या सुरुवातीला कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. तेथे आधुनिक सुविधा येथे उपलब्ध असतील. त्यामुळे राज्यातील रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही, असे राणे यांनी ठामपणे सांगितले.

गोमेकॉत विशेष विभाग स्‍थापन

उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णांची योग्य काळजी घेण्यासाठी गोमेकॉमध्ये विशेष विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागात कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचे नियमित निरीक्षण केले जाईल. तसेच त्यांना योग्य आहार, जीवनशैली आणि मानसिक आधाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

आरोग्यसेवा म्हणजे केवळ आजार बरा करणे नव्हे; तर रुग्णांना सन्मान, आत्मविश्वास आणि आशेने आयुष्य पुन्हा जगण्यासाठी सक्षम करणे होय.

- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT