Sameer Amunekar
कडक ऊन, घाम आणि प्रदूषणामुळे उन्हाळ्यात केस गळतीची समस्या वाढते. पण योग्य नैसर्गिक तेलाचा वापर करून तुम्ही ही समस्या रोखू शकता.
खोबरेल तेल हे केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक कंडिशनिंग मानले जाते. यातील फॅटी ॲसिड्स केसांच्या मुळांना पोषण देऊन गळती थांबवण्यास मदत करतात.
खोबरेल तेलात कडीपत्ता उकळून ते तेल लावल्यास केसांची मुळं मजबूत होतात. कडीपत्त्यातील 'व्हिटॅमिन बी' केस पांढरे होण्यापासूनही वाचवते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. उन्हाळ्यात आवळा तेल लावल्याने टाळूला थंडावा मिळतो आणि केसांची वाढ झपाट्याने होते.
जास्वंदाची फुले आणि पाने तेलात उकळून लावल्याने दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते. हे तेल उन्हाळ्यात केसांना नैसर्गिक चमक देते.
तेल लावण्यापूर्वी ते हलके कोमट करा. बोटांच्या मदतीने टाळूवर (Scalp) हलका मसाज करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि मुळं घट्ट होतील.
केवळ तेल लावून चालणार नाही, तर पुरेसे पाणी प्या आणि उन्हात बाहेर पडताना केस स्कार्फने झाकून ठेवा. निरोगी राहा, केस जपा.