डिचोली: १९७१च्या पूर्वीची कोमुनिदाद वा आल्वरा जमिनीत बांधलेली घरे नियमित करण्यासाठी नवीन कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि येथील महत्त्वाकांक्षी प्रशासकीय ब्लॉक प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.
नागरिकांनी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव न घेता सरकारच्या विविध ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा. डिचोली शहरासाठी 'मास्टरप्लान'ची गरज असून, सिवरेज प्रकल्प ही काळाची गरज आहे.
डिचोली हे सर्वधर्म समभाव जोपसणारे शहर आहे. नियोजित प्रकल्पस्थळी असलेली हिंदू आणि ख्रिश्चन बांधवांची धार्मिकस्थळे संरक्षित करण्यात येतील, अशी ग्वाही सावंत यांनी दिली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाची 'ऑपरेशन सिंदूर' मोहीम देशवासीयांचे मनोबल उंचावणारी ठरली आहे, असेही ते म्हणाले.
या सोहळ्याला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा अतिरिक्त उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी., जी-सुडाचे व्यवस्थापकीय संचालक हरीश अडकोणकर, उपजिल्हाधिकारी नेहाल तळावणेकर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.