'नेहरूंनी गोव्यातून पोर्तुगीज तर इंदिराजींनी सिक्कीममधून चोग्यालांना हाकलले' गेहलोत म्हणतात, 'भारत कधीही झुकला नाही'

Ashok Gehlot: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धबंदी कशी जाहीर केली हे नागरिकांना समजत नाही. हा पूर्णपणे आपल्या सरकारचा निर्णय असायला हवा होता; राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत.
India never bowed down
Ashok GehlotDainik Gomantak
Published on
Updated on

राजस्थान: भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर अचानक झालेल्या युद्धबंदीवरून विरोधी पक्ष मोदी सरकारला घेरत आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक्सवरुन एक पोस्ट शेअर करत दोन घटना कथन केल्या आहे. गेहलोत आणि गोव्यातील ऑपरेशन आणि सिक्कीम बाबत दोन घटनांचे कथन केले आहे.

"भारतावरचा आंतरराष्ट्रीय दबाव पाहून मला माझ्या बालपणीच्या दोन घटना आठवतात ज्यात भारताने सर्व आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता कारवाई केली", असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

पहिला प्रसंग १९६१ मधील आहे त्यावेळी मी सहावीत होतो. १९६१ पर्यंत गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. गोव्याला भारतात विलीन करण्यासाठी पंडित नेहरूंच्या सरकारने लष्करी ऑपरेशन विजय सुरू केले.

पोर्तुगाल हा नाटोचा सदस्य देश होता, म्हणून पोर्तुगीज प्रदेशात नाटोविरुद्ध लष्करी कारवाई केल्यास, पाश्चात्य देश भारतावर हल्ला करू शकतात.

अमेरिकन राजदूतानेही पंडित नेहरूंना भेटून कोणतीही लष्करी कारवाई न करण्याची विनंती केली, परंतु पंडित नेहरूंच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि सैन्याच्या शौर्याने पोर्तुगीजांना तेथून हाकलून लावले आणि गोवा भारतात विलीन झाला.

India never bowed down
Goa Accident: इचलकरंजीच्या तरुणाचा गोव्यात अपघाती मृत्यू; कामावरुन घरी जाताना काळाचा घाला

मी जेव्हा विद्यापीठात शिक्षण घेत होतो तेव्हा, म्हणजे १९७४ पर्यंत, सिक्कीममध्ये चोग्याल राजघराण्याची स्वतंत्र राजसत्ता होता. येथील राणी अमेरिकेची होती, त्यामुळे सिक्कीमला अमेरिकेचा पाठिंबा होता.

१९७४ मध्ये, इंदिरा गांधींच्या सरकारने सिक्कीमचे भारतात विलीनीकरण व्हावे यासाठी मोहीम राबवली. मग अमेरिकेने भारतावर दबाव आणला आणि कारवाई करण्याची धमकीही दिली, पण इंदिराजींनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि सिक्कीमला भारताचा भाग केले.

India never bowed down
हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी; शनिवारपासून गोव्यात 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'

भूतकाळात पाहीले तर भारत कधीही आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकला नाही; म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धबंदी कशी जाहीर केली हे नागरिकांना समजत नाही. हा पूर्णपणे आपल्या सरकारचा निर्णय असायला हवा होता.

इंदिरा गांधींच्या काळापासून भारताचे धोरण असे राहिले आहे की भारत-पाकिस्तानच्या बाबतीत कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही. अलिकडच्या लष्करी कारवाईत अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल संपूर्ण देश चिंतेत आहे आणि केंद्र सरकारने तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यास का भाग पाडले? असा सवाल अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com