Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारचा महत्वाचा निर्णय, रेंट कॅबला स्पीड गव्हर्नर बंधनकारक

Goa Taxi: गोव्यात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Pramod Yadav

Goa Taxi

गोव्यात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मांडवी पुलावर कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर नदीत पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला.

यानंतर रेंट अ कॅबला स्पीड गव्हर्नर बसविण्याची मागणी केली जात होती. सरकारने या सूचनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आता रेंट कॅबला स्पीड गव्हर्नर बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक संचालक प्राविमल अभिषेक यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 नियम 118 नुसार प्रत्येक वाहनाला स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सहाय्यक वाहतूक संचालकांनी सर्व वाहनांना विशेषत: रेंट अ कॅब वरती लक्ष देऊन तपासणी केली जावी आणि स्पीड गव्हर्नर असल्याची खातरजमा केली जावी असे, अभिषेक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

येत्या 11 मार्चपर्यंत सहाय्यक वाहतूक संचालकांना केलेल्या कारवाईची अहवाल दाखल करावा लागणार आहे. अहवालाची 12 मार्च रोजी तपासणी केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

मांडवी पुलावर रेंट ए कॅबने धडक दिल्याने दुचाकी चालक नदीत कोसळला होता. नदीत कोसळलेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तपासाअंती चारचाकी चालकाने मद्य प्राशन केल्याचे समोर आले होते. यानंतर रेंट ए कॅबना स्पीड गव्हर्नर बसविण्याची मागणी केली जात होती.

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी देखील याप्रकरणी टॅक्सी भाड्याने देण्याच्या नियमात बदल करण्याची मागणी केली होती. रेंट कॅबवरती मालकांकडून चालकाची नेमणूक केली जावी. तसेच, मांडवी अपघात प्रकरणात कठोर कारवाई करुन टॅक्सी मालकांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT