Goa Govt Free Laptop To Students Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकार गुणवंत विद्यार्थ्यांना देतेय मोफत लॅपटॉप; अर्ज करण्यासाठी 5 ऑक्टोबरची मुदत

Free Laptop in Goa: जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

Akshay Nirmale

Goa Govt Free Laptop To Students: गोवा सरकारकडून गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जातात. अनुसुचित जमाती (ST) आणि अनुसुचित जाती (SC) या प्रवर्गातील एकूण 20 विद्यार्थ्यांना या योजनेतून मोफत लॅपटॉपचा लाभ मिळणार आहे.

राज्याच्या डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन, टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स (DITE&C) तर्फे ही योजना राबवली जात आहे. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 ही अंतिम मुदत आहे.

इन्फो टेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लि. (ITG) ने ही माहिती दिली आहे. IGT कडून एसटी समुदायातील 5 मुले आणि 5 मुली अशा दहा गुणंवंत विद्यार्थ्यांना तसेच एससी समुदायातील 5 मुले आणि 5 मुली अशा दहा गुणवंत विद्यार्थ्यांना हे लॅपटॉप दिले जातील.

सन 2022-23 या वर्षासाठीची ही योजना आहे. याबाबत https://infotech.goa.gov.in वर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पात्रतेसाठी निकष

  • विद्यार्थ्याचा जन्म गोव्यात झालेला असावा

  • विद्यार्थी एसटी किंवा एसटी समुदायातील असावा

  • त्याने/तिने गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास केलेली असावी

  • त्याला/तिला दहावीच्या परीक्षेत किमान 70 टक्के गुण हवेत

अर्ज करण्याची पद्धत

  • निकषात बसत असलेल्या विद्यार्थ्यांना https://merit.goa.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यातील अडचणींसाठी सरकारच्या वतीने topper.helpdesk@gmail.com किंवा 9607963089/ 9607963098 हे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत.

  • अर्जासोबत जन्मदाखला, आधार कार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र, गुणपत्रिका, पॅन कार्ड किंवा पार्सपोर्ट, निहित नमुन्यातील पालकांचे संमतीपत्र, जातीचा दाखला ही कागदपत्रे सबमिट करावी लागतील.

दरम्यान, अर्जांचा छानणी ITG च्या समितीकडून केली जाईल. त्यानंतर निवड होईल. दरवर्षी ITG कडून या योजनेच्या सुरवात आणि अंतिम मुदतीची घोषणा केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT